IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद संघ (Sunrisers Hyderabad) यांच्यात मागील काही काळात फार दुरावा आला आहे.

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला...
डेव्हिड वॉर्नर
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 11:33 PM

मुंबई : सनरायझर्स हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाचे (Sunrisers Hyderabad) मार्ग आता जवळपास वेगळे झाले आहेत. त्यांच्यातील मतभेदाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दुसऱ्या टप्प्यात आधी वॉर्नरचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. संघव्यवस्थापन एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी त्याला खेळाडूंच्या डगआऊटमध्ये येण्यासदेखील मज्जाव केला. दरम्यान असे असतानाही वॉर्नरने मात्र पुढील वर्षीही हैद्राबाद संघासोबत खेळायला आवडेल असं विधान केलं आहे.

स्पोर्ट्स टुडेशी बोलताना वॉर्नर म्हणाला,”हैद्राबाद माझ्यासाठी माझं दुसरं घर आहे. इथे मला फार प्रेम मिळालं. पण आता पुढील वर्षी कदाचीत आम्ही एकत्र खेळणार नाही, असे संकेत मला मिळत आहेत. पण मला हैद्राबाद संघाकडून खेळायला आवडेल. अर्थात हा निर्णय संघ व्यवस्थापनावरच अवलंबून असेल. मला कर्णधार पदावरुन का कमी करण्यात आलं? याबद्दल मलाही माहित नाही.”

वॉर्नरवर अनेक संघांची नजर

यंदाच्या हंगामाच्या (IPL 2021) सुरुवातीला वॉर्नर हैद्राबाद संघाचा कर्णधार होता, पण खराब फॉर्ममुळे त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले आणि केन विल्यमसनला संघाची कमान देण्यात आली. मात्र, यानंतरही संघाचा पराभवाचा सिलसिला कायम राहिला. वॉर्नरने या मोसमात 8 सामन्यांत 195 धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले होते. आता वॉर्नरसह, चाहतेदेखील पुढील वर्षी होणाऱ्या मेगा लिलावाची वाट पाहात आहेत, जिथे वॉर्नरवर मोठी बोली लावली जाईल अशी अपेक्षा आहे.

वॉर्नर केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही खूप यशस्वी झाला आहे. अशा स्थितीत अनेक आयपीएलमधील संघांच्या नजरा त्याच्यावर असतील. बातमीनुसार, आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी अनेक फ्रँचायझींनी वॉर्नरशी आधीच संपर्क साधला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लिलावात दोन नवीन संघही सहभागी होणार आहेत, त्यामुळे त्यांनादेखील कर्णधार शोधावा लागेल. या संघांसाठी वॉर्नर चांगला पर्याय असेल.

इतर बातम्या

पुढच्या वर्षी IPL च्या मेगा ऑक्शनमध्ये RCB ची पुनर्बांधणी, विराट म्हणतो ‘मजबूत संघ तयार करण्याची संधी’

IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

(David warner says he would love to be at sunrisers hyderabad for next year IPL)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.