IPL 2023 Delhi Capitals: ज्याला कॅप्टनशिपवरुन हटवलं, तो Rishabh Pant च्या जागी बनणार कॅप्टन
IPL 2023 Delhi Capitals: Rishabh Pant आयपीएल 2023 मध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिल्ली कॅपिटल्सने आपला नवीन कॅप्टन निश्चित केलाय.
मुंबई: ऋषभ पंत 30 डिसेंबरला कार अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला मैदानावर पुनरागमन करायला वेळ लागू शकतो. पुढचे काही महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंत आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्सच नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न आहे. या प्रश्नाच उत्तर आता मिळालय. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिल्ली कॅपिटल्सने पुढच्या सीजनसाठी आपला कर्णधार निश्चित केलाय.
त्याच्या नेतृत्वाखाली IPL च विजेतेपद
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सने डेविड वॉर्नरला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतलाय. वॉर्नरकडे आयपीएलमध्ये कॅप्टनशिपचा अनुभव आहे. तो सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन होता. त्याच्या नेतृत्वाखाली SRH ने आयपीएलच जेतेपद पटकावल होतं. त्यानंतर वादांमुळे सनरायजर्स हैदराबादने डेविड वॉर्नरला कॅप्टनशिपवरुन हटवलं. त्यानंतर त्याने SRH ची टीम सोडली.
ऋषभच्या जागी दिल्लीसाठी विकेटकीपिंग कोण करणार?
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी विकेटकीपिंगची जबाबदारी संभाळतो. त्याच्याजागी आता सर्फराज खानला विकेटकीपिंगची जबाबदारी मिळू शकते. ऋषभ पंत टीमबाहेर गेल्यास अंडर 19 टीमला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा यश ढुलला डेब्युची संधी मिळू शकते. यश ढुलला मागच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं होतं. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. अशी आहे दिल्ली कॅपिटल्सची सध्याची टीम
ऋषभ पंत (कॅप्टन), डेविड वॉर्नर, मुकेश कुमार, रिली रोसो, मनीष पांडे, पृथ्वी शॉ, फिल सॉल्ट, रिपल पटेल, रोव्हमॅन पॉवेल, सरफराज खान, यश ढुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिच नॉर्खिया, चेतन सकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, इशांत शर्मा, प्रवीण दुबे आणि विक्की ओस्तवाल.