भारताने धूळ चारताच बदलली टीम, इंग्लंडने बोलावला जगातला नंबर वन फलंदाज, पाहा संघात नेमकं कोणाला स्थान ?
इंग्लंडने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. यावेळी इंग्लंडच्या संघाने डॉम सिब्ली (Dom Sibley) आणि जॅक क्रॉली (Zak Crawley) यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर डावखुरा फलंदाज डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि ऑली पॉप यांना संघात समील करण्यात आलंय.
मुंबई : भारतासोबतच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी इंग्लंडने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. इंग्लंडच्या संघाने डॉम सिब्ली (Dom Sibley) आणि जॅक क्रॉली (Zak Crawley) यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. तर डावखुरा फलंदाज डेव्हिड मलान (Dawid Malan) आणि ऑली पॉप यांना संघात सामील करण्यात आलंय. मलान टी-20 सामन्यांमधील टॉपचा खेळाडू आहे. मलान यापूर्वी 2018 मध्ये कसोटी सामना खेळलेला आहे. इंग्लंडच्या वरच्या फळीत खेळणाऱ्या खेळाडूंचे प्रदर्शन निराशाजनक असल्यामुळे कर्णधार जो रुटच्या चिंता वाढलेल्या आहेत. याच कारणामुळे संघात मोठा बदल करण्यात आलाय. (dawid malan in dom sibley zak crawley dropped by england team know all england squad for the third test match against india)
डेव्हिड मलान, ऑली पॉप, महमूदला संघात स्थान
डेव्हिड मलान तसेच ऑली पॉप यांच्यासह गोलंदाज महमूद यालासुद्धा इंग्लंडने संघात स्थान दिलेलं आहे. महमूदने आतापर्यंत कसोटी सामने खेळलेले नाहीत. त्याबरोबरच साकिब हेडिंग्ले याचीसुद्धा संघात वर्णी लागू शकते. डाव्या हाताचा फिरकीपटू जॅक लीचला टीममधून रिलीज करण्यात आले आहे. मात्र, लीच मोईन अलीच्या जागेवर स्टँडबाय म्हणून संघात राहील. गोलंदाज मार्क वूडच्या खांद्याला मार लागल्यामुळे तो जखमी आहे. असे असले तरी त्याला संघात कायम ठेवण्यात आलंय. भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 25 ऑगस्टला तिसरा कसोटी सामना होईल.
We’ve named our squad for the third LV= Insurance Test match.
Welcome back @dmalan29 ?
— England Cricket (@englandcricket) August 18, 2021
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची टीम कशी असेल ?
जो रूट (कर्णधार) जॉस बटलर (यष्टिरक्षक) डेविड मलान, मोईन अली, सॅम करन, क्रेग ऑवर्टन, जेम्स अँडरसन, हसीब हमीद, ऑली पोप, जॉनी बेयरस्टो, डॅन लॉरेंस, ऑली रॉबिनसन, रॉरी बर्न्स, साकिब महमूद आणि मार्क वुड हा संघ कसोटीच्या तिसऱ्या सामन्यात भारताशी दोन हात करेल.
इतर बातम्या :
T20 World Cup साठी आम्ही उत्सुक, युएईत विजय मिळवणं सोपं, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमचं मत
Tokyo Olympics : महिला Olympic पटूने लिलावात काढलं रौप्यपदक, कारण वाचून हृदय हेलावेल
ICC Test Rankings: लॉर्ड्समधील शतकामुळे जो रूट दुसऱ्या स्थानी, मोहम्मद सिराजलाही जबरदस्त फायदा
(dawid malan in dom sibley zak crawley dropped by england team know all england squad for the third test match against india)