Shubman Gill : 13 SIX, 13 Four, 346 धावा ठोकल्या, शुभमन गिलच्या आधी 2 बॅट्समननी जाम धुतलं
ENG vs SA 3rd ODI : काल शुभमन जी इनिंग खेळला, तशीच बॅटिंग इंग्लंडच्या दोन बॅट्समननी केली. गिलप्रमाणेच इंग्लंडच्या जोस बटलर आणि डेविड मलानने बुधवारी तुफानी शतक ठोकलं.
ENG vs SA 3rd ODI : न्यूझीलंड विरुद्ध काल तिसऱ्या T20 सामन्यात शुभमन गिलने तुफान बॅटिंग केली. काल शुभमन जी इनिंग खेळला, तशीच बॅटिंग इंग्लंडच्या दोन बॅट्समननी केली. गिलप्रमाणेच इंग्लंडच्या जोस बटलर आणि डेविड मलानने बुधवारी तुफानी शतक ठोकलं. मलानने 118 आणि बटलरने 131 धावा फटकावल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 232 धावांची भागीदारी केली. मलान आणि बटलरच्या बॅटिंगच्या बळावर इंग्लंडने तिसरा वनडे सामना 59 धावांनी जिंकला.
जोफ्रा आर्चरचा भेदक मारा
इंग्लंडने एकवेळ 14 धावात 3 विकेट गमावल्या होत्या. जेसन रॉय, डकेट आणि हॅरी ब्रूक स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर बटलर आणि मलानने आक्रमक बॅटिंग केली. टीमला 346 विशाल धावसंख्या उभारुन दिली. दक्षिण आफ्रिकेची टीम या टार्गेटचा पाठलाग करताना 287 रन्सवर ऑलआऊट झाली. इंग्लंडच्या विजयात जोफ्रा आर्चरच महत्त्वाच योगदान होतं. त्याने एकट्याने 6 विकेट काढल्या. दक्षिण आफ्रिकेने ही सीरीज 2-1 अशी जिंकली.
बटलर आणि मलानमुळे दक्षिण आफ्रिकेचा प्लान फेल
जेसन रॉय (1), बेन डकेट (0) आणि हॅरी ब्रूक (6) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मलान आणि बटलरने सुरुवातीला संभाळून बॅटिंग केली. नंतर आक्रमक होत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीतील हवा काढली. मलानने 114 चेंडूत सात चौकार आणि सहा सिक्स मारले. बटलनरने 127 चेंडूत सहा फोर आणि सात सिक्स मारले. दोघांनी मिळून 13 फोर आणि 13 सिक्स मारले.
मोइन अलीची फटकेबाजी
मोइन अलीने यानंतर 23 चेंडूत दोन फोर आणि चार सिक्स मारुन 43 धावा केल्या. इंग्लंडने या मैदानात वनडेमधील सर्वाधिक धावसंख्या केली. याआधी श्रीलंकेच्या नावावर हा रेकॉर्ड होता. श्रीलंकेने 2012 मध्ये पाच विकेटवर 304 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्खियाला आराम दिला. वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका कधी क्वालिफाय होणार?
भारतात यावर्षी 50 ओव्हर्सचा वनडे वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेची टीम अजून क्वालिफाय झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेला प्रत्येक सामन्यात विजय आवश्यक आहे. क्वालिफाय होण्यासाठी नेदरलँड विरुद्ध दोन वनडे सामने बाकी आहेत. इंग्लंडने वर्ल्ड कपच तिकीट आधीच पक्क केलं आहे.