DC vs CSK IPL 2023 High lights : चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय

| Updated on: May 20, 2023 | 7:27 PM

Delhi Capitals vs Chennai Super KingsIPL 2023 Live Score in Marathi : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आयपीएल 2023 चा 68 वा सामना खेळला जाणार आहे. विजयाने शेवट गोड करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. चेन्नईचा स्पर्धेतील पुढचा प्रवास या सामन्यावर अवलंबून आहे.

DC vs CSK  IPL 2023 High lights : चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय
DC vs CSK IPL 2023

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये IPL 2023 मधला 67 वा सामना खेळला गेला. डेविड वॉर्नरची टीम दिल्ली कॅपिटल्सच आयपीएलमधून आव्हान आधीच संपुष्टात आलय. विजयाने शेवट करण्याचा दिल्लीचा प्रयत्न होता. CSK साठी पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. आज जिंकले, तर चेन्नईची टीम थेट प्लेऑफमध्ये दाखल होणार होती. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ही मॅच झाली. मागच्या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर विजय मिळवला होता.

या सामन्यातही तेच घडलं. चेन्नईने दिल्लीवर 77 धावांनी मोठा विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 224 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 146 धावा केल्या. धोनीच्या चेन्नईने दिल्लीवर 77 धावांनी मोठा विजय मिळवला. दिल्लीकडून कॅप्टन डेविड वॉर्नरने एकाकी झुंज दिली. त्याने 58 चेंडूत 86 धावांची खेळी केली. यात 7 फोर आणि 5 सिक्स आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 May 2023 07:18 PM (IST)

    DC vs CSK Live Score : चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय

    चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 224 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 146 धावा केल्या. धोनीच्या चेन्नईने दिल्लीवर 77 धावांनी मोठा विजय मिळवला. दिल्लीकडून कॅप्टन डेविड वॉर्नरने एकाकी झुंज दिली. त्याने 58 चेंडूत 86 धावांची खेळी केली. यात 7 फोर आणि 5 सिक्स आहेत.

  • 20 May 2023 06:40 PM (IST)

    DC vs CSK Live Score : अक्षर पटेल OUT

    14 ओव्हर अखेरीस दिल्लीच्या 5 बाद 110 धावा झाल्या आहेत. डेविड वॉर्नर एकाबाजूने कॅप्टन इनिंग खेळतोय. त्याने 44 चेंडूत 71 धावा केल्या आहेत. यात 5 फोर आणि 5 सिक्स आहेत. अक्षर पटेलला दीपक चाहरने गायकवाडकरवी झेलबाद केलं. अक्षरने 8 चेंडूत 15 धावा केल्या. दीपक चाहरने आतापर्यंत 3 विकेट घेतल्या आहेत.

  • 20 May 2023 06:25 PM (IST)

    DC vs CSK Live Score : वॉर्नरची हाफ सेंच्युरी

    11 ओव्हर अखेरीस दिल्लीच्या 4 बाद 76 धावा झाल्या आहेत. कॅप्टन डेविड वॉर्नर मैदानात आहे. त्याच्या 36 चेंडूत 53 धावा झाल्या आहेत. वॉर्नर आणि अक्षर पटेलची जोडी मैदानात आहे.

  • 20 May 2023 06:02 PM (IST)

    DC vs CSK Live Score : पावरप्लेमध्ये दिल्लीची खराब सुरुवात

    दिल्ली कॅपिटल्सने खराब सुरुवात केली आहे. पावरप्लेमध्ये दिल्लीच्या 3 बाद 34 धावा झाल्या आहेत. ओपनर पृथ्वी शॉ नंतर फिल सॉल्ट (3) आणि रायली रुसो शुन्यावर आऊट झाला. हे दोन्ही विकेट दीपक चाहरने घेतले.

  • 20 May 2023 05:47 PM (IST)

    DC vs CSK Live Score : दिल्लीला पहिला झटका

    3 ओव्हर अखेरीस दिल्ली कॅपिटल्सच्या 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. ओपनर पृथ्वी शॉ 7 चेंडूत 5 धावांवर आऊट झाला. तृषार देशपांडेने रायुडूकरवी कॅचआऊट केलं. कॅप्टन डेविड वॉर्नर आणि फिल सॉल्टची जोडी मैदानात आहे.

  • 20 May 2023 05:18 PM (IST)

    DC vs CSK Live Score : चेन्नईने दिल्लीला विजयासाठी दिलं मोठं टार्गेट

    20 ओव्हर अखेरीस CSK च्या 3 बाद 223 धावा झाल्या आहेत. दिल्लीसमोर विजयासाठी 224 धावांच टार्गेट आहे. अखेरीस रवींद्र जाडेजाने दिल्लीच्या बॉलर्सची धुलाई केली. जाडेजाने 7 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. यात 3 फोर आणि 1 सिक्स आहे. एमएस धोनीने 4 चेंडूत नाबाद 5 धावा केल्या.

  • 20 May 2023 05:07 PM (IST)

    DC vs CSK Live Score : चेन्नईच्या 200 धावा पूर्ण

    19 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 3 बाद 207 धावा झाल्या आहेत. धोनी 1 आणि रवींद्र जाडेजा 11 धावांवर खेळतोय.

  • 20 May 2023 05:05 PM (IST)

    DC vs CSK Live Score : चेन्नईची तिसरी विकेट

    चेन्नईची तिसरी विकेट गेली आहे. दमदार बॅटिंग करणारा डेवॉन कॉनवे आऊट झालाय. त्याने 52 चेंडूत 87 धावा केल्या. यात 11 फोर आणि 3 सिक्स आहेत. नॉर्खियाच्या बॉलिंगवर तो सीमारेषेवर कॅचआऊट झाला.

  • 20 May 2023 05:02 PM (IST)

    DC vs CSK Live Score : शिवम दुबे आऊट

    दिल्लीकडून खलील अहमद 18 वी ओव्हर टाकत होता. शिवम दुबेने या ओव्हरमध्ये खलीलला 2 सिक्स मारले. CSK च्या 2 बाद 195 झाल्या आहेत. कॉनवे (87) धावांवर खेळतोय. शिवम दुबे 9 चेंडूत 22 धावांवर आऊट झाला. त्याने 3 सिक्स मारले.

  • 20 May 2023 04:56 PM (IST)

    DC vs CSK Live Score : चेन्नई 175 च्या पुढे

    17 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 1 बाद 179 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 48 चेंडूत 86 आणि शिवम दुबे 4 चेंडूत 9 धावांवर खेळतोय.

  • 20 May 2023 04:50 PM (IST)

    DC vs CSK Live Score : शिवम दुबे मैदानात

    16 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 1 बाद 167 धावा झाल्या आहेत. ऋतुराज आऊट झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात आलाय. डेवॉन कॉनवे 43 चेंडूत 75 आणि दुबे 3 चेंडूत 8 धावांवर खेळतोय.

  • 20 May 2023 04:44 PM (IST)

    DC vs CSK Live Score : अखेर ऋतुराज गायकवाड OUT

    15 व्या ओव्हरमध्ये अखेर दिल्ली कॅपिटल्सला पहिलं यश मिळालं. दमदार बॅटिंग करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला चेतन साकारियाने राइली रूसोकरवी कॅचआऊट केलं. गायकवाडने 50 चेंडूत 79 धावा केल्या. यात 3 फोर, 7 सिक्स आहेत. 15 ओव्हर अखेरीस CSK च्या 1 बाद 148 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 39 चेंडूत 65 धावांवर खेळतोय.

  • 20 May 2023 04:38 PM (IST)

    DC vs CSK Live Score : कॉनवेची हाफ सेंच्युरी

    खलील अहमदच्या बॉलिंगवर डेवॉन कॉनवेने सिक्स मारुन हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्याने 33 चेंडूत अर्धशतक झळकवलं. 14 ओव्हर अखेरीस CSK च्या बिनबाद 140 धावा झाल्या आहेत. कॉनवे 36 चेंडूत 59 आणि ऋतुराज गायकवाड 48 चेंडूत 79 धावांवर खेळतोय. कॉनवेने 7 फोर, 2 सिक्स मारले.

  • 20 May 2023 04:32 PM (IST)

    DC vs CSK Live Score : ऋतुराजने नॉर्खियाला मारला सिक्स

    13 ओव्हर अखेरीस CSK च्या बिनबाद 127 धावा झाल्या आहेत. नॉर्खिया सारख्या वेगवान बॉलरला गायकवाडने क्लास सिक्स मारला. ऋतुराज गायकवाड 46 चेंडूत 78 धावांवर खेळतोय.

  • 20 May 2023 04:26 PM (IST)

    DC vs CSK Live Score : ऋतुराजने कुलदीप यादवला धुतलं

    ऋतुराज गायकवाडने कुलदीप यादवला धुतलं. 3 चेंडूत सलग 3 सिक्स मारले. 12 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या बिनबाद 117 धावा झाल्या आहेत. ऋतुराज 42 चेंडूत 70 धावांवर खेळतोय. यात 3 फोर, 6 सिक्स आहेत.

  • 20 May 2023 04:22 PM (IST)

    DC vs CSK Live Score : डेवॉन कॉनवेची दमदार बॅटिंग

    चेतन साकारियाने दिल्लीकडून 11 वी ओव्हर टाकली. डेवॉन कॉनवेने या ओव्हरमध्ये 2 फोर मारेल. 11 ओव्हर अखेरीस CSK च्या बिनबाद 97 धावा झाल्या आहेत.

  • 20 May 2023 04:17 PM (IST)

    DC vs CSK Live Score : ऋतुराज गायकवाडची हाफ सेंच्युरी

    10 व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाडने अक्षर पटेलला दोन सिक्स मारले. चेन्नईच्या बिनबाद 87 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाडने 37 चेंडूत हाफ सेंच्युरी झळवकली. त्याने 3 फोर, 3 सिक्स मारले. कॉनवे 23 चेंडूत 35 धावांवर खेळतोय.

  • 20 May 2023 04:10 PM (IST)

    DC vs CSK Live Score : दिल्लीचा विकेटसाठी संघर्ष

    8 ओव्हर अखेरीस CSK च्या बिनबाद 66 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड (33) आणि डेवॉन कॉनवेची (31) जोडी मैदानात आहे.

  • 20 May 2023 04:00 PM (IST)

    DC vs CSK Live Score : पावरप्लेमध्ये अशी आहे स्थिती

    चेन्नई सुपर किंग्सने चांगली सुरुवात केली आहे. पावरप्लेमध्ये CSK च्या बिनबाद 52 धावा झाल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 22 चेंडूत (21) आणि डेवॉन कॉनवे 15 चेंडूत (28) धावांवर खेळतोय.

  • 20 May 2023 03:55 PM (IST)

    DC vs CSK Live Score : चेन्नईच धावांच अर्धशतक पूर्ण

    5 ओव्हर अखेरीस CSK च्या बिनबाद 50 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड (21) आणि डेवॉन कॉनवेची (27) जोडी मैदानात आहे.

  • 20 May 2023 03:46 PM (IST)

    DC vs CSK Live Score : 3 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    3 ओव्हर अखेरीस CSK च्या बिनबाद 30 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड (11) आणि डेवॉन कॉनवेची (17) जोडी मैदानात आहे.

  • 20 May 2023 03:41 PM (IST)

    DC vs CSK Live Score : दिल्ली विरुद्ध चेन्नई सामना सुरु

    2 ओव्हर अखेरीस CSK च्या बिनबाद 19 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड (10) आणि डेवॉन कॉनवेची (8) जोडी मैदानात आहे.

  • 20 May 2023 03:40 PM (IST)

    DC vs CSK Live Score : दिल्लीची प्लेइंग इलेव्हन

    डेविड वॉर्नर (कॅप्टन), यश ढुल, राइली रूसो, अमन खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन सकारिया, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया,

  • 20 May 2023 03:38 PM (IST)

    DC vs CSK Live Score : चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन

    ऋतुराज गायकवाड़, डेवन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोइन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅप्टन), दीपक चाहर, तुषार देशपांडे आणि महीश तीक्ष्णा.

  • 20 May 2023 03:36 PM (IST)

    रायगड | पोलादपूरप्रमाणे माणगांव येथेही सैनिकांचे विश्रामगृह उभारणार – आमदार गोगावले

    गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यातील शहिद जवानांच्या स्मरणार्थ शहिदस्तंभ उभारण्याची मागणी देखील केली मान्य

  • 20 May 2023 03:27 PM (IST)

    लोकांना गृहीत धरलं की काय होतं हे कर्नाटकने दाखवून दिलं – हसन मुश्रीफ

    कर्नाटकचा निकाल हा आपल्यासाठी आशादायी, गेली दोन वर्ष अधिकारी राज्यकर्ते आहेत – हसन मुश्रीफ

    राज्यकर्ते खोके घेऊन बसले आहेत, बेकारी आणि महागाई पासून लक्ष विचलित करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत – हसन मुश्रीफ

    कशाचा विचार करून 2 हजार रुपयाची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला – हसन मुश्रीफ

    बेभरोशाचं सरकार आलं की सर्वसामान्यांचे कसे हाल होतात हे आता आपण पाहत आहोत – हसन मुश्रीफ

  • 20 May 2023 03:03 PM (IST)

    DC vs CSK Live Score : एमएस धोनीने जिंकला टॉस

    एमएस धोनीने टॉस जिंकला आहे. चेन्नई सुपर किंग्सची टीम पहिली बॅटिंग करणार आहे. दिल्ली कॅपिटल्स फिल्डिंग करणार आहे.

  • 20 May 2023 02:30 PM (IST)

    ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात मविआचं सरकार त्या माणसाचं स्वागत करताना आनंद – धनंजय मुंडे

    या महाराष्ट्राचं भविष्य महाविकास आघाडी आहे

  • 20 May 2023 02:30 PM (IST)

    DC vs CSK, Live Score : टॉसच काऊंटडाऊन सुरु

    एमएस धोनीच्या चेन्नईला क्वालिफायरचा मार्ग आज दिल्लीमध्ये सापडेल. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आयपीएल 2023 मधला 67 वा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही टीम्सच काऊंडडाऊन सुरु झालय.

Published On - May 20,2023 2:27 PM

Follow us
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.