DC vs CSK IPL 2023 Result : ठरलं, प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरला
DC vs CSK IPL 2023 Result : सर्वच क्रिकेट रसिकांना उत्सुक्ता आहे, ती प्लेऑफमध्ये कुठल्या टीम्स दाखल होणार त्याची. सध्या चार टीम्स प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. प्लेऑफमध्ये दाखल होणाऱ्या दोन टीम्स आज ठरु शकतात. गुजरात टायटन्सने आधीच प्लेऑफसाठी क्वालिफाय केलय.
नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आज IPL 2023 मधला 67 वा सामना खेळला गेला. CSK साठी पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. कारण आजच्या सामन्याच्या निकालावर प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारी दुसरी टीम कोणती ते ठरणार होतं. IPL 2023 मध्ये 18 पॉइंट्ससह गुजरात टायटन्स क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे आजचा दिवस प्लेऑफच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
प्लेऑफमध्ये कुठले संघ दाखल होतील, ते चित्र आज बऱ्यापैकी स्पष्ट होईल. चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स या टीम्स प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.
धोनीचा निर्णय दोघांनी योग्य ठरवला
आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये मॅच झाली. एमएस धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. CSK चे दोन्ही ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी कॅप्टनचा निर्णय एकदम योग्य ठरवला. दोघांनी दिल्लीच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.
त्याने सलग 3 सिक्स मारले
पहिल्या विकेटसाठी दोघांनी 141 रन्सची भागीदारी केली. गायकवाडने 50 चेंडूत 79 धावा फटकावल्या. यात 3 फोर, 7 सिक्स होते. कुलदीप यादवच्या एका ओव्हरमध्ये त्याने सलग 3 सिक्स मारले. डेवॉन कॉनवेने 52 चेंडूत 87 धावा केल्या. यात 11 फोर आणि 3 सिक्स होते.
चेन्नईचा धावांचा डोंगर
या दोघांनंतर शिवम दुबे 9 चेंडूत 22 धावा आणि रवींद्र जाडेजाने 7 चेंडूत नाबाद 20 धावा फटकावल्या. त्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 223 धावा केल्या. दिल्लीसमोर त्यांनी विजयासाठी 224 धावांच टार्गेट ठेवलं. डेविड वॉर्नर एकटा लढला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 146 धावा केल्या. दिल्लीकडून डेविड वॉर्नर कॅप्टन इनिंग खेळला. त्याने 58 चेंडूत 86 धावा धुवाधार बॅटिंग केली. पण त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. चेन्नईने दिल्लीवर 77 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरला आहे. चेन्नईकडून दीपक चाहर यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 3 विकेट काढल्या. माहीश तीक्ष्णाने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 2 विकेट काढल्या.