DC vs KKR, IPL 2022: कुलदीपने KKR ची वाट लावली, दिल्लीला 147 धावांचे टार्गेट, स्पेशल Highlights चा एकही व्हिडिओ नका चुकवू

DC vs KKR, IPL 2022: आंद्रे रसेलला पंतने स्टम्पिंग केलं. सर्वाधिक विकेट काढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पर्पल कॅपच्या शर्यतीत युजवेंद्र चहल पाठोपाठ कुलदीप दुसऱ्या स्थानावर आहे.

DC vs KKR, IPL 2022: कुलदीपने KKR ची वाट लावली, दिल्लीला 147 धावांचे टार्गेट, स्पेशल Highlights चा एकही व्हिडिओ नका चुकवू
पर्पल कॅपमध्ये तिसऱ्या स्थानी कुलपदीप यादवImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 9:38 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सीजनमध्ये कुलदीप यादव (Kuldeep yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल सुरु होण्याआधी कुलदीपची टीम इंडियात (Team india) निवड झाली होती. पण तिथे त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. जणू त्याचा वचपाच कुलदीप या सीजनमध्ये काढतोय, असं कुलदीपची गोलंदाजी पाहून वाटतय. आज तर त्याने कोलकाता नाइट रायडर्सची (KKR) वाट लावून टाकली. तीन षटकात 14 रन्स देऊन चार महत्त्वाच्या विकेट त्याने काढल्या. आठव्या षटकात गोलंदाजी करताना त्याने पदार्पण करणाऱ्या बाबा इंद्रजीत आणि सुनील नरेन यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केलं. त्यानंतर 14 व्या षटकात गोलंदाजी करताना केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यर आणि आंद्रे रसेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. श्रेयस अय्यरच्या विकेटमध्ये दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतचही मोलाचं योगदान आहे.

ऋषभने घेतला जबरदस्त झेल

त्याने स्टम्पसपाठी एकाहाताने जबरदस्त झेल घेतला. आंद्रे रसेलला पंतने स्टम्पिंग केलं. सर्वाधिक विकेट काढण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पर्पल कॅपच्या शर्यतीत युजवेंद्र चहल पाठोपाठ कुलदीप दुसऱ्या स्थानावर आहे. चहलच्या खात्यात 18 तर कुलदीपच्या नावावर 17 विकेट आहेत.

KKR ची वाट लावणारा कुलदीप यादवचा भन्नाट स्पेल इथे क्लिक करुन एकदा पहाच

श्रेयसने पॅव्हेलियनची वाट धरली, ऋषभ पंतचा जबरदस्त झेल एकदा पहाच

नितीश राणामुळे सन्मानजनक धावसंख्या

दरम्यान ऋषभ पंतने आज टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दिल्लीच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. अवघ्या 35 धावात त्याचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. पण श्रेयस अय्यरने पाचव्या विकेटसाठी नितीश राणासोबत 48 धावांची भागीदारी केली, तसंच नितीश राणाने संघ अडचणीत आज चांगला खेळ केला. त्याने 34 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात तीन फोर आणि चार सिक्स होते.

रिंकू सिंहनेही 23 धावांची खेळी केली. त्यामुळे केकेआरने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये नऊ बाद 146 धावा केल्या. दिल्लीकडून मुस्तफीझूर रहमानने तीन विकेट घेतल्या.

बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.