DC vs KKR, Qualifier 2, Live Score, IPL 2021: केकेआर दिल्लीवर भारी, राहुलने मोक्याच्या क्षणी षटकार ठोकत मिळवला विजय
DC vs KKR Live Score in Marathi: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोघांमधील विजेता संघ हा अंतिम सामन्यात पोहोचणार होता. दरम्यान केकेआरने दिल्लीला नमवत अतिंण सामन्यात एन्ट्री मिळवली आहे.
जगातील अव्वल दर्जाची क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल. याच आयपीएलच्या 14 व्या पर्वातील अंतिम सामना आता अगदी तोंडावर आला आहे. धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने आधीच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. त्यानंतर आता दुसरा संघ कोणता? या प्रश्नाचंही उत्तर आपल्याला मिळालं आहे. शारजाहच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात केकेआरने 4 विकेट्सनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक घेतली आहे. अतिशय रोमहर्षक झालेल्या सामन्यात राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरने गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केली. पण संघातील सर्वच खेळाडू केकेआरच्या माऱ्यासमोर गारद झाले. ज्यामुळे ते केवळ 135 धावाच करु शकले. यामध्ये शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरकडून सलामीवीर अय्यर (55) आणि गिल (46) यांच्या धमाकेदार खेळीने विजय अगदी जवळ आला होता. पण त्यानंतर एक एक करत गडी बाद होत गेले. त्याचवेळी युवा राहुल त्रिपाठीने सामन्याच्या सेकंड लास्ट चेंडूवर षटकार ठोकत संघाला एक चेंडू आणि तीन गडी राखून विजय मिळवून दिला.
LIVE NEWS & UPDATES
-
DC vs KKR: राहुलचा षटकार आणि केकेआर विजयी
सामना हातातून गेला असे वाटत असतानाच केकेआरच्या राहुल त्रिपाठीने षटकार ठोकत एक चेंडू आणि तीन गडी राखून संघाला विजय मिळवून दिला आहे.
-
DC vs KKR: आश्विनचे लागोपाठ दोन विकेट्स
अनुभवी आश्विनने लागोपाठ दोन केकेआरचे गडी बाद केले आहेत. आधी शाकिब आणि नंतर सुनील अशा दोघांना आश्विनने तंबूत धाडलं आहे.
-
-
DC vs KKR: कर्णधार मॉर्गन आजही फेल
संघाला गरज असताना आजही कर्णधार इयॉन मॉर्गन खास कामगिरी करु शकला नाही. नॉर्खिच्या चेंडूवर तो शून्यावर बाद झाला आहे. आता केकेरला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची गरज आहे.
-
DC vs KKR: दिनेश कार्तिक शून्यावर बाद
केकेआरचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला असताना एक एक करुन फलंदाज बाद होत आहेत. दिनेशही 0 धावा करुन बाद झाला आहे. आता संघाला 12 चेंडूक 10 धावांची गरज आहे.
-
DC vs KKR: शुभमनचं अर्धशतक हुकलं!
संघाला उत्तम सुरुवात करुन देणारा शुभमन विजयापर्यंत संघाला घेऊन जाऊ शकला नाही. 46 धावा करुन आवेश खानच्या चेंडूवर तो बाद झाला आहे. केकेआरला 18 चेंडूत 11 धावांची गरज आहे.
-
-
DC vs KKR: नितीश राणा बाद
केकेआरचा दुसरा गडी नितीश राणा 13 धावा करुन बाद झाला आहे. पण संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला असून त्यांना 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज आहे.
-
DC vs KKR: केकेआर विजयाच्या जवळ
केकेआरने आज अप्रतिम खेळ दाखवला आहे. आता ते विजयाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. अखेरच्या 5 षटकांत त्यांना केवळ 23 धावांची गरज आहे. सोबत 9 विकेटही हातात आहेत.
-
DC vs KKR: अर्धशतक करुन व्यंकटेश अय्यर बाद
केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने दमदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. पण 55 धावांवर रबाडाच्या चेंडूवर तो स्मिथच्या हाती झेलबाद झाला आहे.
-
DC vs KKR: केकेआरचा 50 धावांचा टप्पा पूर्ण
कोलकात्याने 136 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदरा सुरुवात केली आहे. सलामीवीर गिल आणि अय्यर चांगल्या लयीत दिसत आहेत.
-
केकेआरसमोर विश्वासात्मक सुरुवात
केकेआरसमोर विश्वासात्मक सुरुवात, सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गील यांची खमकी सुरुवात
-
DC vs KKR: दिल्लीची 135 धावापर्यंत मजल
दिल्ली कॅपिट्स संघाकडून आज सुमार फलंदाजीचे दर्शन झाले. शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या. ज्यामुळे त्यांनी केवळ 135 धावाच स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
-
DC vs KKR: हीटमायरही आऊट
दिल्लीचा खेलाडू शिमरॉन हीटमायर 17 धावा करुन पायचीत झाला आहे.
-
DC vs KKR: कर्णधार पंतही बाद
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत धावा करुन बाद झाला आहे. लॉकी फर्ग्यूसनच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने त्याची कॅच घेतली आहे,
-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार सक्रिय, भाजपवर भ्रष्ट्राचाराचे आरोप
पिंपरी चिंचवड :
-येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार सक्रिय
-पार्थ पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमधील भाजपवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केलेत
-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपकडून इंद्रायणी आणि पवना नदी सुधार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीय
-सर्वांच्या अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चालवण्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, असं पार्थ पवार म्हणाले.
-
DC vs KKR: केकेआरला मोठं यश
दिल्लीचा डाव सुरुवातीपासून सावरलेल्या शिखर धवनची विकेट पडली आहे. शिखर 38 धावा करुन बाद झाला आहे. वरुणनेच त्याला बाद केलं आहे.
-
DC vs KKR: मार्कस स्टॉयनिस बाद
शॉ बाद होताच धवनसोबत दिल्लीचा डाव सांभाळणारा मार्कसही 18 धावा करुन बाद झाला आहे. शिवम मावीने त्याला बाद केलं आहे.
-
DC vs KKR: दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी बाद
आल्याआल्या तुफान खेळीने सुरुवात करणारा पृथ्वी शॉ वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आहे. 18 धावा करुन शॉ तंबूत परतला आहे.
-
DC vs KKR: दिल्लीचे सलामीवीर मैदानात
केकेआरने गोलंदाजी निवडल्याने प्रथम फलंदाजीला आलेले दिल्लीचे सलामीवीर मैदानात आले आहेत. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडी मैदानात आली आहे.
-
DC vs KKR: मार्कस स्टॉयनिस संघात परत
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस आज महत्त्वाच्या सामन्यात संघात परत एन्ट्री करत आहे.
-
DC अंतिम 11
पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हिटमायर, मार्कस स्टॉयनिस, अक्षर पटेल, ए. नॉर्खिया, आर आश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान
-
KKR अंतिम 11
इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रस्सेल/शाकिब अल् हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
-
DC vs KKR: दिल्लीकडे प्रथम फलंदाजी
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने प्रथम गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे दिल्लीचे खेळाडू प्रथम फलंदाजी करणार आहेत.
-
आतापर्यंत DC vs KKR
केकेआर आणि दिल्ली हे संघ आतापर्यंत 29 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी 15 सामने जिंकत केकेआर पुढे आहे. तर दिल्लीने 13 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. य़ाशिवाय एक सामना हा अनिर्णीत देखील राहिला आहे. पण आजचा सामना अतिशय महत्त्वाचा असल्याने दोन्ही संघ संपूर्ण प्रयत्न करणार असून अंतिम 11 काय असेल? याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
Published On - Oct 13,2021 7:02 PM