IPL 2021: केकेआरचे सलामीवीर बरसले, मोक्याच्या क्षणी त्रिपाठीचा षटकार, दिल्लीवर 3 विकेट्सने विजय, अंतिम सामन्यात थाटात एन्ट्री

आयपीएलच्या 14 व्या पर्वाच्या अंतिम सामन्यातील दोन्ही संघ आता आपल्या समोर आले आहेत. चेन्नईचा संघ याआधीच अंतिम सामन्यात पोहोचला असताना दिल्लीला नमवत केकेआरने देखील अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे.

IPL 2021: केकेआरचे सलामीवीर बरसले, मोक्याच्या क्षणी त्रिपाठीचा षटकार, दिल्लीवर 3 विकेट्सने विजय, अंतिम सामन्यात थाटात एन्ट्री
केकेआरचे फलंदाज गिल आणि अय्यर
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 11:34 PM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दोन्ही फायनलिस्ट संघ आपल्याला मिळाले आहेत. धोनीच्या चेन्नईने पहिल्या क्वॉलीफायर सामन्यात दिल्लीला नमवत अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली होती. आता केकेआरने देखील दिल्लीला नमवत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. पण केकेआर आणि दिल्लीमधील हा सामना म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील काही चुरशीच्या सामन्यांपैक एक ठरला.

दिल्लीच्या 136 या सोप्या लक्षाचा पाठलाग केकेआरने उत्तम सुरु केला. एका क्षणी केकआरला 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज होती. सोबत त्यांच्या हातात 8 विकेट्सही होते. पण त्याच क्षणी दिल्लीच्या गोलंदाजानी जादूई  गोलंदाजी करत केकेआरचे एक-एक फलंदाज तंबूत धाडले. एकाक्षणी 2 चेंडूत 6 धावांची गरज केकेआरला असतानाच राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. विजयानंतर संपूर्ण केकेआर संघाने जल्लोष केला.

दिल्लीची सुमार फलंदाजी

सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केली. पण संघातील सर्वच खेळाडू केकेआरच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर गारद झाले. ज्यामुळे ते केवळ 135 धावाच करु शकले आहेत. यामध्येही शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या. य़ाशिवाय शॉ आणि स्टॉयनीसने प्रत्येकी 18 तरल हीटमायरने 17 धावा केल्या. केकेआरकडून मिस्ट्री स्पीनर चक्रवर्तीने 2 तर मावी आणि फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

‘राहुल नाम तो सुनाही होगा’

अवघ्या 136 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या केकेआरच्या सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी करत संघाचा विजय जणू पक्का केला होता. व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी मिळून मोठी भागिदारी केली. 96 धावांवर संघ असताना अय्यर 55 धावा करुन बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर शुभमन 46 धावा करुन बाद झाला. त्याने 46 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्यासोबत नितीशने 13 धावा केल्या. पण या दोघांच्या बाद होताच संघाला जणू उतरती कळाच लागली. एक एक करत फलंदाज बाद होत गेले. अगदी शेवटच्या षटकात लागोपाठ दोन विकेट जाताच 2 चेंडूत 6 धावांची गरज संघाला होती. त्याचवेळी राहुल त्रिपाठीने दमदार असा षटकार ठोकत संघाला 3 विकेट्स आणि 1 चेंडू राखून विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

RCB Captiancy: ‘विराट कर्णधार म्हणून अपयशीच’, 3 देशांच्या 4 दिग्गज क्रिकेटपटूंचे टीकास्त्र

(DC vs KKR, Qualifier 2, match Kolkata knight riders won match with 3 wickets against Delhi capitals)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.