DC vs PBKS IPL 2022: पंजाब किंग्सचे हिटर्स दिल्ली समोर फेल, कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर टेकले गुडघे

DC vs PBKS IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा सुरु झाल्यापासून जास्तीत जास्त सामन्यांमध्ये फलंदाजांनीच सरस कामगिरी केली आहे. फलंदाजांच राज्य दिसून आलं आहे.

DC vs PBKS IPL 2022: पंजाब किंग्सचे हिटर्स दिल्ली समोर फेल, कॅपिटल्सच्या गोलंदाजांसमोर टेकले गुडघे
दिल्ली कॅपिटल्स Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 9:19 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा सुरु झाल्यापासून जास्तीत जास्त सामन्यांमध्ये फलंदाजांनीच सरस कामगिरी केली आहे. फलंदाजांच राज्य दिसून आलं आहे. पण आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सचा (DC vs PBKS) सामना अपवाद दिसून आला. आजचा दिवस दिल्लीच्या गोलंदाजांनी गाजवला. कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) ऐनवेळी या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आलं. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हा सामना होणार होता. पण कोविडमुळे पुण्याऐवजी मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरु आहे. पंजाब किंग्सकडे शिखर धवन, मयंक अग्रवला, लियाम लिव्हिंगस्टोन सारखे अव्वल फलंदाज आहेत. पण आज हे सगळेच फलंदाज अपयशी ठरले. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी हा सार्थ ठरवला.

लिव्हिंगस्टोनकडून भरपूर अपेक्षा होत्या, पण…

पहिली तीन षटक पंजाबने चांगली फलंदाजी केली. पण सलामीवीर शिखर धवन बाद झाला. त्यानंतर पंजाब किंग्सच्या डावाची सुरु झालेली घसरण. शेवटपर्यंत थांबली नाही. ललित यादवच्या फिरकी गोलंदाजीवर फटका खेळताना शिखर धवन बाद झाला. ऋषभ पंतने यष्टीपाठी जबरदस्त झेल घेतला. खरंतर ललितने टाकलेला चेंडू एवढा खास नव्हता. पण शिखर चुकीचा फटका खेळला. त्यानंतर कॅप्टन मयंक अग्रवाल पाठोपाठ तंबूत परतला. लियाम लिव्हिंगस्टोनकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण आज तो स्वस्तात बाद झाला. या सीजनमध्ये लिव्हिंगस्टोन जबरदस्त फलंदाजी करत आहे.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

सात धावात चार विकेट

लियाम लिव्हिंगस्टोन अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंतने त्याचं स्टम्पिंग केलं. 33 ते 54 या 21 धावात पंजाबने चार विकेट गमावल्या. त्यानंतर 85 ते 92 दरम्यान सात धावात चार विकेट गमावल्या. पंजाबकडून विकेटकिपर जितेश शर्माने सर्वाधिक 32 धावा केल्या. राहुल चाहरने अखेरीस एक चौकार आणि एक षटकार लगावल्यामुळे पंजाबला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. दिल्लीकडून खलील अहमद, कुलदीप यादव, अक्षर पटेल, ललित यादव यांनी प्रत्येकी दोन, तर मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतला. पंजाब किंग्सचा डाव 115 धावात आटोपला. दिल्ली विजयासाठी 116 धावांचे टार्गेट आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.