DC vs RCB IPL 2022 Dinesh Karthik: ये एज-वेज में विश्वास नही रखता, सगळ्यांची एकच भावना, त्याला T-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये घ्याच
DC vs RCB IPL 2022 Dinesh Karthik: यंदाच्या IPL मध्ये एका फलंदाजाने सर्वांचच मन जिंकलय. तो फलंदाजीला आल्यानंतर धावांचा पाऊस ठरलेला आहे. त्याच्या बॅटमधून चौकार-षटकार सहज बरसतात.
मुंबई: यंदाच्या IPL मध्ये एका फलंदाजाने सर्वांचच मन जिंकलय. तो फलंदाजीला आल्यानंतर धावांचा पाऊस ठरलेला आहे. त्याच्या बॅटमधून चौकार-षटकार सहज बरसतात. समोर संघ चेन्नई असो, लखनौ, दिल्ली किंवा मुंबईचा असो. गोलंदाज कोण आहे? त्याच नाव किती मोठं आहे, त्याने त्याला काही फरक पडत नाही. चेंडू टप्प्यात आला की, त्याला सीमारेषा दाखवायची हेच त्याला ठाऊक. बर हा फलंदाज वयाने खूप तरुण आहे, विशी-तिशीतला आहे, तर असंही नाही. T 20 क्रिकेट हा तरुणाचा खेळ. वयाच्या तिशीत पोहोचलेल्यांकडून इथे फार अपेक्षा ठेवल्या जात नाहीत. कारण टी 20 क्रिकेटचं (T 20 cricket) वैशिष्टय म्हणजे वेग. इथे मोठे फटके खेळण्याबरोबर फिल्डिंग करतानाही तितकीच चपळाई लागते. हे सगळे निकष तो वयाच्या 36 व्या वर्षी पूर्ण करतो. महत्त्वाचं म्हणजे त्याचा खेळ पाहून तो 36 वर्षाचा वाटतच नाही. या क्रिकेटपटूचं नाव आहे, दिनेश कार्तिक. (Dinesh Karthik) तो खेळपट्टीवर आला की, स्टेडियममध्ये DK, DK, Dk चा जयघोष सुरु होतो. बरं तो ही आपल्या चाहत्यांना अजिबात निराश करत नाही. डीके खेळपट्टीवर येतो, तेव्हा परिस्थिती अडचणीची असते. एकतर निम्मा संघ तंबूत परतलेला असतो किंवा कमी चेंडूत जास्त धावांची आवश्यकता असते.
कदाचित मुस्ताफिजुर रहमानला आज रात्री झोप लागणार नाही
आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातही अशीच स्थिती होती. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या पाच बाद 92 धावा झाल्या होत्या. कठीण परिस्थिती होती. पण दिनेश कार्तिकने कुठलाही दबाव न घेता आपला खेळ सुरु ठेवला. त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते. सहाव्या विकेटसाठी दिनेश आणि शाहबाज अहमदमध्ये 55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी झाली. दिनेशच्या या वादळी खेळीमुळेच आरसीबीला 189 ही डोंगराएवढी धावसंख्या उभारता आली. 18 व षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीची दिनेश कार्तिकने वाट लावली. त्याच्या एका ओव्हरमध्ये 4,4,4,6,6,4, अशा 28 धावा वसूल केल्या. कदाचित मुस्ताफिजुर रहमानला त्याची फलंदाजी आठवून आज रात्री झोप लागणार नाही.
Dinesh Karthik should pick in Team India’s T20 World Cup squad.#dineshkarthik #RCBvsDC pic.twitter.com/J4hG0edCQd
— CRICKET? (@AbdullahNeaz) April 16, 2022
Greatest finisher at the moment #dineshkarthik ??
He deserves every Appreciation ? pic.twitter.com/1oQOuzvx0m
— Shamsi (MSH) (@Shamsihaidri1) April 16, 2022
वयाच्या हिशोबाने तो फिट वाटणार नाही
दिनेश कार्तिकच्या या खेळीनंतर यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. वयाच्या हिशोबाने दिनेश कदाचित निवड समिती सदस्यांना फिट वाटणार नाही. पण आजचा त्याचा फॉर्म पाहिला, तर त्याला भारतीय संघाबाहेर ठेवण हे आपलचं नुकसान करुन घेण्यासारखा आहे.
Take a bow to Dinesh Karthik ? In my point of view #dineshkarthik has already fix his place in T20 WC #T20worldcup #GOAT? pic.twitter.com/VH0rdjImJA
— Ashutosh Srivastava (@kingashu1008) April 16, 2022
Name – Dinesh Karthik Age – 36+ Once again i’m seeing him men in blue Anyone else here ??#CSKvsRCB #RCB #RCBvsCSK #ShivamDube #robinuthappa #dineshkarthik pic.twitter.com/HJZtFjjlT4
— Rithik Rajeev Yadav (@Rithikdb5) April 12, 2022
लाजबाव असेच शब्द तोंडातून बाहेर पडतात
मिडविकेट, कव्हर्सला तो जे काही चौकार-षटकार मारतोय, ते पाहून लाजबाव असेच शब्द तोंडातून बाहेर पडतात. सध्या कौन हैं प्रविण तांबे हा चित्रपट OTT वर गाजतोय. त्यामध्ये श्रेयस तळपदे एक डायलॉग बोलतो. ‘सर ये एज-वेज में विश्वास नही रखता’ दिनेशची सध्याची बॅटिंग पाहली की, हेच शब्द पहिले आठवतात.