DC vs RCB, Live Score, IPL 2022: RCB चा दिल्ली कॅपिटल्सवर 16 धावांनी विजय

| Updated on: Apr 16, 2022 | 11:53 PM

Delhi Capitals vs Royal chllengers Banglore Live Score in Marathi: दिल्लीने मागचा सामना जिंकला होता, तर आरसीबीचा संघ पराभूत झाला होता.

DC vs RCB, Live Score, IPL 2022: RCB चा दिल्ली कॅपिटल्सवर 16 धावांनी विजय
दिल्ली कॅपिटल्स वि आरसीबी

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज दिल्ली कॅपिटल्सचा (RCB vs DC) 16 धावांनी पराभव केला. RCB चा यंदाच्या सीजनमधील हा चौथा विजय आहे. दिल्लीचा तिसरा पराभव आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नाबाद 66, ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) 55 शाहबाज अहमद नाबाद 32 आणि जोश हेझलवूड यांनी आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 189 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी 190 धावांच लक्ष्य दिलं होतं. पण त्यांनी निर्धारित 20 षटकात सात बाद 173 धावा केल्या. RCB चा मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. आजच्या विजयाने त्यांनी जोरदार कमबॅक केलं आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 16 Apr 2022 11:26 PM (IST)

    RCB चा दिल्ली कॅपिटल्सवर 16 धावांनी विजय

    रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला. RCB चा यंदाच्या सीजनमधील हा चौथा विजय आहे. दिल्लीचा तिसरा पराभव आहे.

  • 16 Apr 2022 11:16 PM (IST)

    दिल्लीला 12 चेंडूत 34 धावांची गरज

    हर्षल पटेलने 18 व षटक टाकलं. दिल्लीच्या सहा बाद 156 धावा झाल्या आहेत. शार्दुलने या ओव्हरमध्ये एक षटकार मारला. शार्दुल 17 आणि अक्षर पटेल तीन धावांवर खेळतोय.

  • 16 Apr 2022 11:09 PM (IST)

    ऋषभ पंत OUT, विराटने घेतला जबरदस्त झेल

    चांगली फलंदाजी करणारा ऋषभ पंत 34 धावांवर आऊट झाला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर विराटने त्याचा जबरदस्त झेल घेतला. 17 षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या सहा बाद 145 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 11:03 PM (IST)

    ऋषभ पंत – शार्दुल ठाकूरची जोडी मैदानात

    16 षटकात दिल्लीच्या पाच बाद 134 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 26 आणि शार्दुल ठाकूरची 7 जोडी मैदानात आहे. ऋषभ आणि शार्दुल धावांवर खेळतोय.

  • 16 Apr 2022 10:39 PM (IST)

    आक्रमक फलंदाजी करणारा डेविड वॉर्नर OUT

    12 षटकात दिल्लीच्या दोन बाद 95 धावा झाल्या आहेत. डेविड वॉर्नर 66 धावांवर आऊट झाला. हसरंगाने त्याला पायचीत पकडलं. वॉर्नरने चार चौकार आणि पाच षटकार लगावले.

  • 16 Apr 2022 10:07 PM (IST)

    पावरप्लेमध्ये दिल्लीची जबरदस्त फलंदाजी

    पावरप्लेच्या सहा षटकात दिल्लीच्या एक बाद 57 धावा झाल्या आहेत. डेविड वॉर्नर 38 धावांवर खेळतोय.

  • 16 Apr 2022 10:00 PM (IST)

    पृथ्वी शॉ बाद

    दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली होती. 4.4 षटकात त्याच्या 50 धावा झाल्या आहेत. पण त्याचवेळी मोहम्मद सिराजने सलामीवीर पृथ्वी शॉ ला अनुज रावतकरवी झेलबाद केलं. त्याने 16 धावा केल्या.

  • 16 Apr 2022 09:47 PM (IST)

    दिल्लीच्या डावाला सुरुवात

    दोन षटकात दिल्लीच्या बिनबाद 19 धावा झाल्या आहेत. वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही सलामीची जोडी मैदानात आहे.

  • 16 Apr 2022 09:25 PM (IST)

    55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी

    दिनेश कार्तिकने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार आहेत. सहाव्या विकेटसाठी दिनेश आणि शाहबाज अहमदमध्ये 55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी झाली. शाहबाज अहमद 32 धावांवर नाबाद राहिला.

  • 16 Apr 2022 09:11 PM (IST)

    एका ओव्हरमध्ये लुटल्या 28 धावा

    18 व षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीची दिनेश कार्तिकने वाट लावली. त्याच्या एका ओव्हरमध्ये 4,4,4,6,6,4, 28 धावा वसूल केल्या.

  • 16 Apr 2022 08:51 PM (IST)

    शाहबाज अहमद-दिनेश कार्तिकची जोडी मैदानात

    15 षटकात RCB च्या पाच बाद 115 धावा झाल्या आहेत. शाहबाज अहमद 15 आणि दिनेश कार्तिक 13 धावांवर खेळतोय.

  • 16 Apr 2022 08:35 PM (IST)

    ग्लेन मॅक्सवेल OUT

    हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुंडाळलं. मॅक्सवेलन 34 चेंडूत 55 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत. आरसीबीच्या 11.2 षटकात पाच बाद 92 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 08:32 PM (IST)

    ग्लेन मॅक्सवेलची शानदार हाफ सेंच्युरी

    11 षटकात आरसीबीच्या चार बाद 91 धावा झाल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली आहे. तो 33 चेंडूत 55 धावांवर खेळतोय. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत.

  • 16 Apr 2022 08:24 PM (IST)

    सुयश प्रभूदेसाई OUT

    अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळताना सुयश प्रभूदेसाई सहा धावांवर आऊट झाला. कुलदीप यादवने हा झेल घेतला. 9.3 षटकात आरसीबीच्या चार बाद 75 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 08:19 PM (IST)

    कुलदीप यादवच्या षटकात लुटल्या 23 धावा

    नवव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर 4,4,6,6,2,1 असा प्रहार केला. त्याने तब्बल 23 धावा लुटल्या.

  • 16 Apr 2022 08:06 PM (IST)

    विराट कोहली Run out

    RCB ला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली ललित यादवच्या थ्रो वर 12 धावांवर रन आऊट झाला. 6.2 षटकात आरसीबीच्या तीन बाद 40 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 08:03 PM (IST)

    पावरप्लेमध्ये RCB च्या दोन विकेट, मॅक्सवेलची दमदार फलंदाजी

    पावरप्लेच्या सहा षटकात RCB च्या दोन बाद 40 धावा झाल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल 19 आणि विराट कोहली 12 धावांवर खेळतोय.

  • 16 Apr 2022 07:48 PM (IST)

    आरसीबीला मोठा झटका

    आरसीबीला मोठा झटका. कॅप्टन फाफ डू प्लेसिस 8 धावांवर आऊट. खलील अहमदने पटेलकरवी झेलबाद केलं. तीन षटकात आरसीबीच्या दोन बाद 17 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 07:44 PM (IST)

    आरसीबीला पहिला झटका

    आरसीबीला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर अनुज रावतला शार्दुल ठाकूरने शून्यावर पायचीत केलं. दोन षटकात आरसीबीच्या एक बाद 12 धावा झाल्या आहेत.

  • 16 Apr 2022 07:34 PM (IST)

    अशी आहे आरसीबीची Playing – 11

    फाफ डू प्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज

  • 16 Apr 2022 07:33 PM (IST)

    अशी आहे दिल्लीची Playing – 11

    पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद

Published On - Apr 16,2022 7:29 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.