DC vs RR : राजस्थानसमोर दिल्लीचं 155 धावांचं माफक लक्ष्य, सॅमसनची टीम टॉप 4 मध्ये स्थान मिळवणार?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिला टी-20 सामना अबू धाबीच्या मैदानात खेळवला जात आहे.

DC vs RR : राजस्थानसमोर दिल्लीचं 155 धावांचं माफक लक्ष्य, सॅमसनची टीम टॉप 4 मध्ये स्थान मिळवणार?
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 5:54 PM

अबू धाबी : आयपीएल 2021 मध्ये आज सुपर शनिवार आहे. म्हणजे आज दोन सामन्यांची मेजवानी आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिला टी-20 सामना अबू धाबीच्या मैदानात खेळवला जात आहे. राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला आणि अवघ्या 21 धावांत दिल्लीचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. (DC vs RR: Delhi’s easy target of 155 against Rajasthan, will Samson’s team get place in top 4?)

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर आलेल्या कर्णधार रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने काही वेळ किल्ला लढवला खरा परंतु दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. आधी रिषभ पंत 24 धावा करुन बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शिमरन हेटमायरने काही वेळ फटकेबाजी करुन दिल्लीला शतक पूर्ण करुन दिलं. मात्र त्यालाही फार वेळ मैदानात तग धरता आला नाही.

ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले. दिल्लीने कसाबसा दिडशे धावांचा टप्पा पार केला. राजस्थानच्या युवा गोलंदाजांनी आज भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. मुस्तफिजूर रहमान आणि चेतन साकरियाने 4 षटकांमध्ये अनुक्रमे 22 आणि 33 धावा देत प्रत्येकी दोन बळी घेतले. तर राहुल तेवतिया आणि कार्तिक त्यागीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. अखेर निर्धारित 20 षटकांमध्ये दिल्लीला 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारता आली.

अवघड आव्हान

दिल्लीने राजस्थानला 20 षटकात 155 धावांचे माफक लक्ष्य दिले आहे. हे लक्ष्य राजस्थानची टीम सहज पूर्ण करु शकणार नाही. कारण दिल्लीकडेही एकापेक्षा एक उत्तम गोलंदाज आहेत. दिल्लीचा युवा गोलंदाज आवेश खानने आतापर्यंत या स्पर्धेत अनेक मोठ्या फलंदाजांना बाद सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यासोबत आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाज नॉखिया हा देखील दिल्लीच्या संघात आहे. सोबत मागच्या वर्षीचा पर्पल कॅप विजेता कगिसो रबाडाचा तोफखाना देखील आहेच. भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू आर. अश्विन आणि अक्षर पटेल या दोघांच्या फिरकीसमोर राजस्थानच्या फलंदाजांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

इतर बातम्या

IPL 2021 : DC vs RR : आजचा सामना अश्विन आणि सॅमसनसाठी खास, दोघांकडे मोठ्या विक्रमाची संधी

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(DC vs RR: Delhi’s easy target of 155 against Rajasthan, will Samson’s team get place in top 4?)

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.