IPL 2021: दिल्लीची भेदक गोलंदाजीसह चोख फलंदाजी, हैद्राबादवर 8 गडी राखून विजय
सुरुवातीला वेगवान गोलंदाजाच्या मदतीने भेदक गोलंदाजी केल्यानंतर फलंदाजीतही क्लास दाखवत दिल्ली कॅपिटल्स संघाने हैद्राबाद संघावर 8 विकेट्सनी विजय मिळवला आहे.
दुबई: आयपीएलच्या 14 व्या हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज (22 सप्टेंबर) झालेल्या यंदाच्या हंगामातील 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) सनरायजर्स हैद्राबादवर (SRH) दमदार विजय मिळवला आहे. तब्बल 8 विकेट्सने दणकेबाज विजय मिळवत दिल्लीने ते का यंदाच्या हंगामात अव्वल स्थानावर आहेत हे दाखवून दिलं आहे. तर दुसरीकडे हंगामाच्या सुरुवातीपासून खराब प्रदर्शन करणाऱ्या हैद्राबादने आजचा सामना गमावत यंदाच्या हंगामातील ट्रॉफीचं स्वप्न जवळपास भंग केलं आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतलेला हैद्राबादचा निर्णय साफ चुकिचा ठरला. संघातील एकाही खेळाडूला 30 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. संघाकडून सर्वाधिक धावा या युवा खेळाडू अब्दुल समाद याने केल्या असून त्याने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याशिवाय राशिदने 22 धावा केल्या. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील बेस्ट फलंदाज केन विल्यमसनही आज केवळ 18 धावाच करु शकल्याने हैद्राबाद केवळ 134 धावांपर्यंत मजल मारु शकला.
दिल्लीची ‘वेगवान’ गोलंदाजी
दिल्लीच्या संघाने हैद्राबादला 134 धावाच करु दिल्या. यामध्ये संघाच्या वेगवान गोलंदाजानी महत्त्वाची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज नॉर्खिया आणि रबाडा यांनी भेदक गोलंदाजी करत अनुक्रमे 2 आणि 3 विकेट्स घेतले. यामध्ये नॉर्खियाने अतिशय वेगवान आणि अप्रतिम चेंडू टाकत 4 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा दिल्या. याशिवाय अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या असून 2 फलंदाज धावचीत झाले.
दिल्लीची धुवांदार फलंदाजी
आधी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांनी देखील आपली कामगिरी चोखरित्या पार पाडली. सलामीला आलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvu Shaw) यांनी चांगली सुरुवात केली. पण 11 धावा करुन शॉ बाद झाला तरी शिखरने मात्र धडाकेबाज फलंजाजी सुरुच ठेवली. त्याने 37 चेंडूत 6 षटकार आणि एक चौकार ठोकत 42 धावा केल्या. ज्यानंतर उर्वरीत जबाबदारी कर्णधार ऋषभ पंत (नाबाद 35) आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद 47) यांनी पार पाडत संघाला 8 विकेट्सनी दमदार विजय मिळवून दिला.
Dominant @DelhiCapitals seal a comfortable win! ? ?
The @RishabhPant17-led unit register their 7th win of the #VIVOIPL & move to the top of the Points Table. ? ? #DCvSRH
Scorecard ? https://t.co/15qsacH4y4 pic.twitter.com/5CAkMtmlzu
— IndianPremierLeague (@IPL) September 22, 2021
दिल्लीच्या नॉर्खियाने टाकला हंगामातील वेगवान चेंडू
दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्खिया (Anrich Nortje) याने दुबईच्या मैदानात आणखी एक कारनामा करुन दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असणाऱ्या नॉर्खियाने आय़पीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर आता सनरायजर्स हैद्राबाद संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातीलही वेगवान चेंडू फेकला आहे. नॉर्खियाने तब्बल 151.7 इतक्या वेगाचा चेंडू टाकत फलंदाजालाही हैराण करुन सोडलं.
हे ही वाचा
IPL 2021: भारताचा ख्रिस गेल, ज्याला आज्जीनं कपडे धुवायच्या धोपटण्यानं क्रिकेटर बनवलं, गाजवतोय आयपीएल
(DC vs SRH Live match Delhi capitals won game with 8 wickets)