IND vs WI: धोनीची CSK 14 कोटी रुपये खर्चून विकत घेतलेल्या गोलंदाजाला मुकणार?
भारताने काल वेस्ट इंडिज विरुद्धचा (India vs West indies) तिसरा टी-20 सामना जिंकून मालिका खिशात घातली. पण भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.
कोलकाता: भारताने काल वेस्ट इंडिज विरुद्धचा (India vs West indies) तिसरा टी-20 सामना जिंकून मालिका खिशात घातली. पण भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. याचा फटका भारताला श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Srilanka) मालिकेत बसण्याची शक्यता आहे. या गोलंदाजाच्या दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा सुद्धा टेन्शन वाढलं असणार. कारण तो चेन्नईचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. IPL 2022 च्या सीजनला आता महिन्याभराचा अवधी उरलेला असताना ही दुखापत झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात दीपक चाहरला (Deepak Chahar) हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. दीपक चाहरच्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्याबद्दल थोडी साशंकता वाटत आहे. दीपक चाहरला कालच्या सामन्यात चांगला सूर गवसला होता. त्याने सुरुवातीला दोन विकेटही काढल्या होत्या. पण दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकताना दीपक लंगडताना दिसला. लगडतच त्याने मैदान सोडलं.
‘टीयर’ ची दुखापत असेल, तर… भारताने वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना 17 धावांनी जिंकला असला, तरी त्याची दुखापत चिंतेचा विषय आहे. दीपक चाहरला झालेली हॅमस्ट्रिंगची दुखापत किती गंभीर आहे, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. ‘टीयर’ ची दुखापत असेल, तर दीपक चाहर आयपीएलच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळू शकतो का? हा प्रश्न आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये दीपक चाहरला CSK ने 14 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलं आहे.
ग्रेड वनच्या टीयरमधून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी, बरं होण्यासाठी सहा आठवड्याचा कालावधी लागतो. अजून दोन दिवसांनी 24 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेत दीपक चाहरच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे.
प्वारप्लेमध्ये विकेट काढणं, ही त्याची खासियत वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजमध्ये तीन विकेट घेणारा दीपक चाहर भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. प्वारप्लेमध्ये विकेट काढणं, हे त्याच्या गोलंदाजीच वैशिष्ट्य आहे. त्याशिवाय तो उपयुक्त फलंदाजीही करु शकतो. मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी दीपक चहर उपलब्ध नसेल, तर त्याची उणीव नक्की जाणवेल. दीपक चहरची दुखापत गंभीर असेल, तर चेन्नई सुपर किंग्सचीही अडचण वाढेल.
deepak chahar injury update chances of playing in india vs sri lanka series and ipl 2022 for csk