‘अकेला हैं मिस्टर खिलाडी, मिस खिलाडी…’, पहा Deepak Chahar चा बायको सोबतचा डान्सचा सुपर VIDEO

टीम इंडिया (Team India) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) अलीकडेच आयुष्यात नवी इनिंग सुरु केली.

'अकेला हैं मिस्टर खिलाडी, मिस खिलाडी...', पहा Deepak Chahar चा बायको सोबतचा डान्सचा सुपर VIDEO
deepak chaharImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:42 AM

मुंबई: टीम इंडिया (Team India) आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) अलीकडेच आयुष्यात नवी इनिंग सुरु केली. या महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या धूमधडाक्यात दीपक चाहरच गर्लफ्रेंड जया भारद्वाज सोबत लग्न झालं. चाहरने आतापर्यंत लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अलीकडेच त्याने संगीतचा एक व्हिडिओ शेअर केला. चाहत्यांना दीपक चाहरचा हा व्हिडिओ आवडला असून त्यावर अनेक कमेंटही आल्या आहेत. संगीतच्या या व्हिडिओमध्ये दीपक चाहर पत्नी जया सोबत डान्स करताना दिसतोय. दीपकच्या तुलनेत जया थोडी जास्त मोकळेपणाने नाचली. पण दीपकही मागे नव्हता. त्याने उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलाय.

‘अकेला हे मिस्टर खिलाडी’

अक्षय कुमारचा हिट चित्रपट ‘खिलाडी’ मधील ‘अकेला हे मिस्टर खिलाडी’ या गाण्यावर डान्स केला. जयाने कभी खुशी कभी गम चित्रपटातील बोले चुडिया गाण्यावर परफॉर्म केलं. हा व्हिडिओ शेअर करताना दीपक चाहरने, या गाण्यावर परफॉर्म करताना, क्रिकेट मॅचपेक्षाही माझ्यावर जास्त दबाव होता, असं म्हटलं आहे. काही फॅन्सनी त्याला बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यांना दीपक चाहरचा डान्स भरपूर आवडला.

स्टँडसमध्ये जाऊन गर्लफ्रेंडला प्रपोज केलं

मागच्यावर्षी आयपीएलच्या वेळीच दीपक चाहरने जया भारद्वाजला प्रपोज केलं होतं. केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतर दीपकने स्टँडसमध्ये जाऊन सामना पहायला आलेल्या जयाला प्रपोज केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दीपक चाहर सध्या त्याच्या दुखापतीमधून सावरतोय. एनसीएमध्ये त्याचा रिहॅबचा कार्यक्रम सुरु आहे. त्याला पाठिची दुखापत झाली आहे. यामुळेच तो यंदाच्या आयपीएलमध्ये सीजनमध्ये खेळू शकला नाही. चेन्नई सुपर किंग्सने त्याला 14 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.