VIDEO : दीपक चहरने गिटार वाजवत गायलं सुरेख गाणं, टीम सदस्यानेही दिली साथ
भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पहिल्या दोन सामन्यात मात देत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा ठरला तो दिपक चहारचा...
मुंबई : भारत आणि श्रीलंका (India vs Sri lanka) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चहरने (Deepak Chahar) भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. उत्कृष्ठ खेळी खेळणाऱ्या दीपकवर या सामन्यात किती तणाव होता हे त्याला मैदानात येणाऱ्या घामावरुनच कळत होते. अखेरच्या काही षटकांत गर्मीमुळे दीपकची हालत खराब झाल्याची दिसून येत होतं. त्यामुळे या तणावपूर्ण सामन्यानंतर विश्रांतीच्या वेळेत विरंगुळा म्हणून दिपकने गिटार हातात घेऊन जुनी हिंदी गाणं पसंत केलं आहे.
व्हिडीओमध्ये दीपक हातात गिटार घेऊन ते वाजवत जुनी हिंदी गाणी गात आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो संघाचा फिजीयो असणाऱ्या निरंजन पंडीत याने देखील दीपकला गाणं गाण्यात साथ दिली आहे. दीपकचा हा व्हीडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.
? ?
??? ????? ?????? ??. @deepak_chahar9 & ???????? ?????? – #????????? ?????? ??? ??? ??? ????? ??????. ??#?????? pic.twitter.com/IE87xyggsA
— BCCI (@BCCI) July 22, 2021
दीपकची रोमहर्षक खेळी
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे सलामीवीर काही वेळातच तंबूत परतले. एकट्या सूर्यकुमार यादवने 53 धावा ठोकत एकाकी झुंज दिली मात्र तोही बाद झाल्यावर भारताच्या विजयाची आशाही मावळताना दिसत होती. त्यावेळी सातव्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या दीपक चहाकरने सामन्याची सूत्र हाती घेतली. सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली. दोघांनी मिळून भारताला अप्रतिम विजय मिळवून दिला.
हे ही वाचा :
IND vs SL : 2021 मध्ये 2017 प्रमाणेच भारताचा रोमहर्षक विजय, तोच संघ, तोच खेळाडू, वाचा सुंदर योगायोग
दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?