बॉलिवूडचं स्टार जोडपं IPL च्या मैदानात, नवी टीम खरेदी करुन शाहरुख-प्रितीला टक्कर देणार
आगामी आयपीएलमध्ये दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण एक नवा संघ खरेदी करणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : आयपीएल म्हटलं की जोश, जल्लोष, थरार आलाच. आगामी आयपीएलमध्ये हा जोश दुप्पट होणार आहे. कारण आगामी आयपीएलमध्ये दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण एक नवा संघ खरेदी करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Deepika Padukone Ranveer Singh Set To Bid For New IPL Team in 2022)
आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी क्रिकेट संघ खरेदी केले आहेत. यात जुही चावला, शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यासारख्या बड्या कलाकारांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ आता अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही सहभागी होणार आहेत.
8 ऐवजी 10 संघ
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएलमध्ये 8 ऐवजी एकूण 10 संघांचा समावेश असणार आहे. येत्या आयपीएलमध्ये दोन नवे आयपीएल संघ पाहायला मिळणार आहेत. हे संघ नेमके कोणते असतील, त्यांची नावं काय असतील याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र या दोन टीम खरेदी करण्यासाठी अनेक मोठमोठे कलाकार लिलावात सहभागी होण्याची शक्यता आहे.
अनेक कलाकार, व्यावसायिक हे क्रिकेट टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोललं जात आहे. यात रणवीर आणि दीपिकाचेही नाव समोर येत आहे. याबाबत त्यांनी अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या टीमबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. लोकप्रिय फुटबॉल क्लब मॅंचेस्ट युनायटेडच्या मालकांनीदेखील आयपीएल टीम खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
खेळाडूंचा पुन्हा लिलाव
दरम्यान 2 नव्या आयपीएल टीमसोबत खेळाडूंचा लिलावही पुन्हा केला जाणार आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूवर आगामी आयपीएलमध्ये पुन्हा बोली लावली जाणार आहेत. त्यामुळे जर रणवीर-दीपिका या जोडीने क्रिकेटचा संघ खरेदी केला तर ते जुही चावला, शाहरुख खान, प्रिती झिंटा, शिल्पा शेट्टी यांच्या यादीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’
IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात
(Deepika Padukone Ranveer Singh Set To Bid For New IPL Team in 2022)