DC vs MI IPL 2023 Preview : पहिल्या विजयासाठी आज Mumbai Indians च्या टीममध्ये काय बदल होतील?

DC vs MI IPL 2023 Preview : पराभवाची मालिका तोडण्यासाठी रोहित शर्मा आज काय करणार? मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना मागचा सीजन आठवत असेल. मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात अशीच झाली होती.

DC vs MI IPL 2023 Preview : पहिल्या विजयासाठी आज Mumbai Indians च्या टीममध्ये काय बदल होतील?
ipl 2023 rohit sharma mumbai indians
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 9:00 AM

DC vs MI IPL 2023 Preview : यंदाच्या आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स अशा दोन टीम्स आहेत, ज्यांना अजूनपर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. या दोन टीम्सपैकी एकाच मंगळवारी खात उघडणार हे निश्चित आहे. दिल्ली आपल्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळणार आहे. दोन्ही टीम्सचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. यंदाच्या सीजनमध्ये दोन्ही टीम्सचा संघर्ष सुरु आहे.

दिल्ली कॅपिटल्सने या सीजनमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक केलीय. मुंबई इंडियन्सचा पहिला दोन सामन्यात पराभव झालाय. या दोन्ही टीम्सचा एक मुख्य प्रॉब्लेम आहे. या दोन्ही टीम्सना विनिंग कॉम्बिनेशन सापडत नाहीय. आजच्या सामन्यात विनिंग कॉम्बिनेशन शोधण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असेल.

मुंबई इंडियन्सच काय चुकतय?

मुंबई इंडियन्स बद्दल बोलायच झाल्यास, त्यांच्याकडे मोठी नावं आहेत. चांगले प्रतिभावान खेळाडू आहेत. पण हे दोन्ही प्रकारचे खेळाडू अजूनपर्यंत फेल ठरलेत. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 8 विकेटने, त्यानंतर चेन्नईने मुंबईला आरामात हरवलं. टीमच्या बॅटिंगची धुरा कॅप्टन रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादववर टिकून आहे. पण तिघेही फेल ठरलेत.

या तिघांची बॅट कधी तळपणार?

टिम डेविड, कॅमरुन ग्रीन आणि ट्रिस्टन स्ट्ब्सने टीमला निराश केलय. मागच्या सीजनमध्ये तिलक वर्माच्या रुपाने मुंबईला चांगला फलंदाज मिळाला. त्याने RCB विरुद्ध पहिल्या सामन्यात 84 धावा फटकावल्या. मात्र त्याच्याशिवाय अन्य दुसरे फलंदाज प्रभावित करु शकलेले नाहीत. कॅप्टन रोहित शर्माला धावा बनवाव्या लागतील, तर अन्य फलंदाजांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

मुंबईच्या टीममध्ये काय बदल होतील?

दोन्ही टीममध्ये बदलांबद्दल बोलायच झाल्यास, जोफ्रा आर्चर टीममध्ये आल्यास, जेसन बेहरनडॉर्फला बाहेर बसाव लागेल. अर्शद खानने प्रभावित केलेलं नाही. त्याच्याजागी संदीप वॉरियरला संधी मिळू शकते. मुंबई कुमार कार्तिकेय आणि तिलक वर्मा यांचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करु शकते.

दिल्लीच्या टीममध्ये काय बदल होतील?

दिल्लीच्या टीममध्ये खलील अहमद पूर्णपणे फिट नाहीय. चेतन साकरिया त्याची जागा घेऊ शकतो. मागच्या मॅचमध्ये दिल्लीने पृथ्वीचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर केला होता. आज सुद्धा दिल्लीची टीम असाच प्रयोग करु शकते. प्रथम फलंदाजी केल्यास मुकेश कुमारचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर होऊ शकतो. मिचेल मार्शच्या जागी फिल सॉल्टला संधी मिळू शकते.

दोन्ही टीम्स

दिल्ली कॅपिटल्स: डेविड वॉर्नर (कॅप्टन), पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रोव्हमॅन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, मुस्ताफिजुर रहमान, मुकेश कुमार, खलील अहमद, राइली रुसो, मिचेल मार्श, अमन हाकिम खान, चेतन साकरिया, ललित यादव, विक्की ओस्तवाल, मनीष पांडे, यश ढुल, कमलेश नागरकोटी, एनरिक नॉर्खिया, अभिषेक पोरेल, फिल सॉल्ट, लुंगी एंगिडी, प्रवीण दुबे, इशांत शर्मा, राइली रुसो, रिपल पटेल, मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कॅमरन ग्रीन, रिले मेरेडिथ, नेहाल वढेरा, ऋतिक शौकीन, डुआन यानसेन, जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, रमनदीप सिंह,पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, विष्णु विनोद, शम्स मुलानी, अर्शद खान, राघव गोयल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.