IPL सुरु होण्याअगोदर ‘सामना’, यंदा आम्हीच जिंकणार म्हणत विराट कोहलीच्या साथीदाराने प्रतिस्पर्ध्यांना डिवचलं

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अद्याप आयपीएलचं जेतेपद पटकावलं नाही. आरसीबीचा संघ पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, आता हे पाहणे आवश्यक आहे की संघ दुसऱ्या टप्प्यात आपला तोच फॉर्म सुरु ठेवतो की नाही...

IPL सुरु होण्याअगोदर 'सामना', यंदा आम्हीच जिंकणार म्हणत विराट कोहलीच्या साथीदाराने प्रतिस्पर्ध्यांना डिवचलं
देवदत्त पडीकल आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 9:20 AM

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीझन भारतात आयोजित केला गेला पण नंतर कोरोनाच्या संसर्गामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएलचं 14 वं पर्व थांबवावं लागलं. आता लीगचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. सर्व संघ संयुक्त अरब अमिरातीला पोहोचले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने अद्याप आयपीएलचं जेतेपद पटकावलं नाही. आरसीबीचा संघ पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, आता हे पाहणे आवश्यक आहे की संघ दुसऱ्या टप्प्यात आपला तोच फॉर्म सुरु ठेवतो की नाही… संघाचा सलामीवीर आणि विराट कोहलीचा विश्वासू सहकारी देवदत्त पडिक्कलने आयपीएलचं 14 वं पर्व आम्हीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

लीगच्या पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात फारसा फरक नाही आणि पहिल्या टप्प्यातील गती कायम राखणे सर्व संघांसाठी महत्त्वाची बाब असेल. पडिक्कलनेही आशा व्यक्त केली आहे की यावेळी आरसीबीचा संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल. आमची त्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे, असं पडीक्कलने सांगितलं.

आरसीबीने पहिल्या लीगमध्ये 7 पैकी 5 सामने जिंकले आणि दोन सामने गमावले. गुणतालिकेत आयसीबी तिसऱ्या स्थानावर आहे. पडिक्क्कलने मुलाखतीत सांगितलं, “आम्ही स्पर्धेला पुन्हा सुरुवात करत आहोत. असं वाटत नाही की आम्ही बराच ब्रेक घेतला आहे, कारण आमच्यामध्ये मधल्या काळात प्रॅक्टिस सुरुच होती… मोठा ब्रेक झाल्यासारखं वाटत नाही. पहिल्या टप्प्यात आम्हाला मिळालेली सुरुवात जोरदार होती… तोच फॉर्म कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करु”

पहिल्या टप्प्यातील खेळाविषयी काय म्हणाला पडीकल?

आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात पडिकलने आयपीएलचे पहिले शतक मुंबईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध केले. पडिक्कल म्हणाला, “मला वाटलं नाही की मी त्या क्षणी मी ते करु शकेन. मला विश्वास होता की मी धावा करु शकतो. मी ते शतक झळकावण्याची कल्पनाही केली नव्हती. मी जात असताना, मला फक्त माहित होते की तो दिवस मला काहीतरी मोठे करायचे आहे आणि ते करणे खूप महत्वाचे आहे… तसे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत. एकदा तुमच्याकडे तो क्षण आला की, फक्त तो गृहीत धरावा लागतो आणि मला वाटलं की मी त्या दिवशी चांगला खेळलो.”

यंदाचं वर्ष आमचं

20 वर्षीय देवदत्तने यावर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी -20 पदार्पण केले. या हंगामात बंगळुरु जेतेपद जिंकणारच याबद्दल पडीकल आशावादी दिसला. “मला अशी आशा आहे. दरवर्षी प्रत्येकजण आयपीएल जिंकण्याच्या एकाच आशेने येतो. आशा आहे की यंदाचं वर्ष आमचं असेल. आमच्याकडे चांगली टीम आहे आणि काही चांगले पर्याय आहेत. आव्हानाला सामोरं जायचं आणि असलेली गती कायम ठेवायचा विचार आहे.”

(Devdutt padikal Says RCB will Win this time IPL 2021)

हे ही वाचा :

Manchester Test : ‘त्या’ रात्री भारतीय खेळाडू रात्री 3 वाजेपर्यंत झोपले नाहीत, टीम इंडियाच्या टीकाकारांना दिनेश कार्तिकची सडेतोड उत्तरं

इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची IPL 2021 मधून माघार, मँचेस्टर कसोटी रद्द झाल्याचा परिणाम?

IPL 2021 : रोहित शर्मा, बुमराह आणि सूर्यकुमार अबू धाबीत दाखल, सरावासाठी वाट पाहावी लागणार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.