IND vs SA: वेंकटेश अय्यरला एक षटकही का दिलं नाही? शिखर धवनने सांगितलं कारण…

तब्बल सहा महिन्यानंतर भारतीय संघ वनडे फॉर्मेटमध्ये खेळत होता. बहुतांश खेळाडू खासकरुन गोलंदाजीमध्ये ती धार दिसली नाही. भारतीय संघ पाच गोलंदाजांना घेऊन खेळत होता.

IND vs SA: वेंकटेश अय्यरला एक षटकही का दिलं नाही? शिखर धवनने सांगितलं कारण...
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 3:17 PM

पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvsSA) पहिल्या वनडे मॅचमध्ये काल भारताचा 31 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने सहाबाद 296 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने पन्नास षटकात सहाबाद 265 धावा केल्या. कर्णधार म्हणून काल केएल राहुलचा (KLRahul) पहिलाच सामना होता. तब्बल सहा महिन्यानंतर भारतीय संघ वनडे फॉर्मेटमध्ये खेळत होता. बहुतांश खेळाडू खासकरुन गोलंदाजीमध्ये ती धार दिसली नाही. भारतीय संघ पाच गोलंदाजांना घेऊन खेळत होता.

राहुलने अय्यरला एक षटकही दिलं नाही हार्दिक पांड्याच्या जागी अष्टपैलू म्हणून वेंकटेश अय्यरचा संघात समावेश करण्यात आला होता. कॅप्टन केएल राहुलने वेंकटेश अय्यर सहावा गोलंदाजीचा पर्याय आहे, असे सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले होते. काल प्रमुख गोलंदाज बावुमा आणि डुसेची भागीदारी फोडण्यात अपयशी ठरत होते. पण त्यावेळी राहुलने अय्यरकडून एक षटकही गोलंदाजी करुन घेतली नाही.

म्हणून दिली नाही बॉलिंग फलंदाजीमध्ये वेंकटेशने निराश केले. 7 चेंडूत त्याने फक्त दोन धावा केल्या. सामन्यानंतर शिखर धवनने वेंकटेश अय्यरकडून एक षटकही गोलंदाजी का करुन घेतली नाही? त्याचं कारण सांगितलं. “वेंकटेश अय्यरला गोलंदाजीला आणलं नाही. खेळपट्टीवर चेंडू वळत होते आणि फिरकी गोलंदाज चांगली बॉलिंग करत होते. मधल्याषटकांमध्ये वेगवान गोलंदाजांकडे चेंडू दिला नाही. फिरकी गोलंदाजांकडून बॉलिंग करुन घेतली” असे धवनने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

संघ हिताला प्राधान्य दिलं मधल्याषटकात भारताने जी खराब फलंदाजी केली, त्याबद्दलही धवनने आपलं मत मांडलं. धवनने (79) आणि कोहलीने (51) धावा केल्या. हे दोघे बाद होताच भारताचा डाव गडगडला. “परिस्थितीनुसार आम्ही खेळ केला. परिस्थितीची काय गरज आहे, संघ हिताला प्राधान्य दिलं. व्यक्तीगत खेळही महत्त्वाचा आहे” असे धवन म्हणाला. मधल्याफळीतल्या चुका कशा दुरुस्त करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शिखरने, “एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही 2023 चा वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून संघ बांधणी करत आहोत. त्यामुळे थोड्याफार काही गोष्टी वर-खाली होणार. एक संघ म्हणून आम्ही अजून काय चांगलं करु शकतो, याचा विचार करतो”

Dhawan reveals why Venkatesh Iyer didn’t bowl a single over during 1st ODI

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.