कार्तिक, साहा आणि पंत यांच्यात यष्टीपाठी धोनीचं सर्वोत्तम का? अश्विनने सांगितलं कारण…
युट्यूबवर एका चाहत्याने धोनीला साहा, कार्तिक आणि धोनीमध्ये एका विकेटकिपरची निवड करायला सांगितली. त्यावर अश्विनने यष्टीपाठी धोनी अपवाद असल्याचं सांगितलं.
चेन्नई: क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारतीय संघ सातत्याने यशस्वी ठरतोय, त्यामागे विकेटकिपिंग कौशल्य हे एक महत्त्वाचं कारण आहे. भारतीय विकेटकिपर्समध्ये एम.एस. धोनी (MS Dhoni) हे सर्वात मोठं नाव आहे. फक्त विकेटकिपर म्हणूनच नाही, तर हुशार कर्णधार म्हणूनही धोनीने स्वत:ला सिद्ध केलं आहे. धोनीच्या बरोबरीने दिनेश कार्तिक, (Dinesh karthik) वृद्धीमान साहा आणि ऋषभ पंत यांना सुद्धा भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना विकेटकिपिंगची संधी मिळाली.
सध्या ऋषभ पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची पहिली पसंती आहे. धोनीने २०१४ साली कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर साहाला सातत्याने संधी मिळाली. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन धोनीसह अन्य तीन यष्टीरक्षकांसोबत खेळला आहे. आता अश्विनने गोलंदाजी करताना यष्टीपाठी विकेटकिपर म्हणून त्याची पहिली पसंती कोण आहे, त्याबद्दल सांगितलं आहे.
युट्यूबवर एका चाहत्याने अश्विनला साहा, कार्तिक आणि धोनीमध्ये एका विकेटकिपरची निवड करायला सांगितली. त्यावर अश्विनने यष्टीपाठी धोनी अपवाद असल्याचं सांगितलं. “स्टम्पसच्यामागे उभा असताना धोनीच्या हातून काही सुटल्याचं अपवादानेच घडलं असावं” असं अश्विन म्हणाला. “तामिळनाडूत मी दिनेश बरोबर बरचं क्रिकेट खेळलोय. पण मला एकाची निवड करायची असेल, तर तो धोनी आहे” असे अश्विनने सांगितलं.
“धोनीच्या हातून काही सुटल्याचं मी अपवादाने पाहिलं आहे. स्टम्पिंग असो, रनआऊट किंवा झेल, यष्टीपाठी धोनीने नेहमीच चपळाईने हालचाली केल्या आहेत. साहा सुद्धा फार मागे नाहीय” असं अश्विन म्हणाला. धोनीने वनडे क्रिकेटमधून २०२० मध्ये निवृत्ती स्वीकारली. आता तो फक्त आयपीएलमध्ये खेळतोय. वृद्धीमान साहा आणि ऋषभ पंत भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा भाग आहेत.
संबंधित बातम्या: IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….