IPL 2022: थाला म्हातारा झाला, पोट सुटलं, CSK आयपीएल ट्रॉफी कशी जिंकणार? फॅन्स टेन्शनमध्ये

IPL 2022:  क्रिकेट खेळताना फिटनेस (Fittness) खूप महत्त्वाचा असतो. स्वत:ला फिट ठेवणारा क्रिकेटपटू दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकतो. सध्याच्या भारतीय संघात विराट कोहलीच्या (Virat kohli) फिटनेसचे दाखले दिले जातात.

IPL 2022: थाला म्हातारा झाला, पोट सुटलं, CSK आयपीएल ट्रॉफी कशी जिंकणार? फॅन्स टेन्शनमध्ये
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 11:07 AM

IPL 2022:  क्रिकेट खेळताना फिटनेस (Fittness) खूप महत्त्वाचा असतो. स्वत:ला फिट ठेवणारा क्रिकेटपटू दीर्घकाळ क्रिकेट खेळू शकतो. सध्याच्या भारतीय संघात विराट कोहलीच्या (Virat kohli) फिटनेसचे दाखले दिले जातात. याआधी महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) फिटनेसनी नेहमी चर्चा असायची. धोनी भारतीय क्रिकेटमधला एक फिट क्रिकेटपटू समजला जातो. एकेरी-दुहेरी धावा पळून काढण्याची धोनीची क्षमता पाहून क्रिकेट चाहते अवाक व्हायचे. मोहालीमधला 2016 सालचा टी-20 वर्ल्डकपमधला सुपर 10 स्टेजचा सामना क्रिकेटरसिक आजही विसरणार नाहीत. त्यावेळी धोनीने एकेरी-दुहेरी धावा पळून चक्क विराट कोहलीला दमवलं होतं. स्वत: विराट कोहलीने या माणसाने मला फिटनेस टेस्ट असल्यासारखं पळवलं, असं टि्वट केलं होतं. धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारुन आता दीड वर्ष होत आलं आहे.

धोनी वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण करेल

धोनीने फिटनेस टिकवून ठेवल्यामुळे अजूनपर्यंत तो जगातील एका श्रीमंत लीग आयपीएलमध्ये खेळतोय. यंदा सात जुलैला धोनी वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण करेल. धोनी मागचे बरेच महिने क्रिकेटपासून दूर होता. धोनी सध्या आयपीएलच्या 15 व्या सीजनची तयारी करतोय.

वय आता धोनीच्या चेहऱ्यावर दिसू लागलं आहे. त्याचा परिणाम त्याच्या फिटनेसवर होतोय. आयपीएलला आता फक्त काही आठवड्यांचा अवधी उरला आहे. टीम्सनी सराव सुरु केला आहे. सीएसकेचा संघ सूरतमध्ये प्रॅक्टीस करतोय. फ्रेंचायजींनी या ट्रेनिंग सेशनचे फोटो वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले आहेत.

धोनीच्या शरीराचा आकार बदलला

CSK चे फॅन्स आपल्या स्टार प्लेयर्सना क्रिकेट खेळताना पाहण्याती उत्सुक आहेत. पण त्याचवेळी त्यांना धोनीच्या फिटनेसची चिंताही सतावत आहे. धोनीचे फोटो समोर आल्यानंतर अनेक फॅन्स टि्वटरवर व्यक्त झाले आहेत. या फोटोंमध्ये धोनीच्या शरीराचा आकार बदलेला दिस आहेत. धोनीचं पोट सुटलं असून वजन वाढलं आहे. धोनीचे सफेद केसही दिसत आहेत. धोनीचं वय झाल्याचं स्पष्टपणे या फोटोमध्ये दिसून येतय. त्यामुळे सीएसकेच्या फॅन्सची चिंता वाढली आहे. असाच थालाचा फिटनेस असेल, तर आयपीएलचं पाचव जेतेपद कसं मिळवणार? याची त्यांना मुख्य चिंता आहे.

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.