Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीत सलग तीन वादळी शतकं, दिलीप वेगंसरकर म्हणतात ‘हीच ती वेळ’

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare Trophy) सलग तीन शतक केली आहेत.

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची विजय हजारे ट्रॉफीत सलग तीन वादळी शतकं, दिलीप वेगंसरकर म्हणतात 'हीच ती वेळ'
ऋतुराज गायकवाड
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 11:32 AM

मुंबई: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hajare Trophy) सलग तीन शतक केली आहेत. केरळ विरोधात 124, छत्तीसगड विरोधात 154 आणि मध्य प्रदेश विरोधात 136 धावांचीं खेळी केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या खेळीवर माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी ऋतुराजला दक्षिण आफ्रिकेविरोधातील एक दिवसीय मालिकेत संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. दिलीप वेगंसरकर यांनी विजय हजारे ट्रॉफीतील ऋतुराज गायकवाडचा भन्नाट फॉर्म, आयपीएलमधील टॉप रन स्कोअरर या गोष्टींमुळे त्याला आता टीम इंडियाच्या वनडे संघात संधी मिळायला हवी, असं म्हटलं आहे. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराजची निवड आता थेट दक्षिण आफ्रिके विरोधातील वनडे टीममध्ये व्हावी, अशी इच्छा दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.

ऋतुराज गायकवाड विजय हजारे ट्रॉफीत भन्नाट फॉर्ममध्ये

विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज गायकवाड सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यानं केरळ विरोधात 124, छत्तीसगड विरोधात 154 आणि मध्य प्रदेश विरोधात 136 धावांचीं खेळी केली आहे. तर, आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडनं 16 मॅचमध्ये 45.35 च्या सरासरीनं 635 धावा केल्या होत्या. सीएसकेला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देण्यात ऋतुराजचं महत्त्वाचं योगदान होतं.

शिखर धवनच्या नेतृत्त्वात टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेली होती. त्या टीममध्ये ऋतुराजला संधी देण्यात आली होती. त्यावेळी त्यानं दोन टी-20 सामन्यांमध्ये 35 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडे सध्या के.एल.राहुल आणि रोहित शर्मा हे दोन ओपनर आहेत. त्यामुळं ऋतुराज गायकवाड तिसऱ्या स्थानावर देखील बॅटिंग करु शकतो. ऋतुराज गायकवाडला सध्या संधी देणं गरजेचं आहे, असं दिलीप वेंगसरकर म्हणाले. ऋतुराजचं सध्याचं वय 24 आहे त्यामुळं त्याला आता संधी देण्याची गरज आहे. तो 28 वर्षांचा झाल्यानंतर त्याला संधी देऊन उपयोग नाही, असं देखील वेंगसरकर म्हणाले. ऋतुराज गायकवाड 10 वर्षांचा असताना त्याची खेळी पाहून वेंगसरकर प्रभावित झाले होते.

शिखर धवन ऐवजी ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांना संधी?

टीम इंडियाचा सीनियर खेळाडू शिखर धवनला धावा काढण्यासाठी संघर्ष करायला लागतोय. तर, विजय हजारे ट्रॉफीनंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन मॅच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येईल. विजय हजारे ट्रॉफीतील ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर यांना संधी मिळू शकते. ऋतुराज गायकवाडला संधी मिळाल्यास तो तिसऱ्या स्थानी तर व्यकटेश अय्यर ला संधी मिळाल्यास तो पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर खेळू शकतो.

इतर बातम्या

Yuvraj singh : 40 व्या वाढदिवसादिवशी युवराजची मोठी घोषणा, घेऊन येणार NFT

Team india : दक्षिण आफ्रीका दौऱ्यात या युवा खेळाडुंना संधी मिळणार, तर यांना बाहेरचा रस्ता

Dilip Vengsarkar former Indian skipper said it is time to select Ruturaj Gaikwad for South Africa Tour

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.