‘रवी शास्त्री पेक्षा Rahul Dravid यांच्या कोचिंग मध्ये…’, दिनेश कार्तिकने सांगितला आपला अनुभव
टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या कार्यकाळात टीम इंडियाला मोठ यश मिळालं. त्यांनी संघाचा दृष्टीकोन आणि अंदाज दोन्ही गोष्टी बदलल्या.
मुंबई: टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या कार्यकाळात टीम इंडियाला मोठ यश मिळालं. त्यांनी संघाचा दृष्टीकोन आणि अंदाज दोन्ही गोष्टी बदलल्या. आता टीमची कोचिंग राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या हातात आहे. टीम इंडियाचा फिनिशर विकेटकीपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) द्रविड यांच्या कार्यकाळात जास्त चांगलं वाटतं, असं म्हटलं आहे. “हेड कोच रवी शास्त्री हे खेळाडूंना लक्ष्य गाठण्यासाठी प्रेरित करायचे. पण त्यांना अपयश मान्य नव्हतं. ते त्यांना सहनच व्हायच नाही” असं दिनेश कार्तिकने म्हटलय. शास्त्री आणि कोहली यांचा कार्यकाळ भारतीय क्रिकेटसाठी चांगला ठरला. पण खराब फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंच्या पाठिशी उभ न राहिल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली.
संघाने कसं खेळलं पाहिजे हे त्यांना चांगलं ठाऊक होतं
वेगवान फलंदाजी न करणारे क्रिकेटपटू शास्त्री यांना पसंत नव्हते, असं कार्तिकने क्रिकबजच्या एका कार्यक्रमात सांगितलं. “संघाला काय हवं आणि संघाने कसं खेळलं पाहिजे हे शास्त्री यांना चांगलं ठाऊक होतं. त्यांना अपयश सहनच व्हायच नाही. ते नेहमीच सगळ्यांना चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करायचे” असं कार्तिक म्हणाला.
कोणाच्या कार्यकाळात जास्त बरं वाटतं?
विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात समाधानी असल्याचं कार्तिक म्हणाला. आयपीएल मधील शानदार प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने टीम इंडियात कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेतील शानदार प्रदर्शनानंतर दिनेश कार्तिकने संघात आपलं स्थान पक्क केलं. आता तो आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसेल.