Dinesh Karthik: टीम इंडियासाठी ‘हा’ खेळाडू बनणार पुढचा विराट कोहली, दिनेश कार्तिकच मोठं वक्तव्य
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकने कुठल्या आधारावर त्या खेळाडूबद्दल हे मत मांडलं....
मुंबई: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते. त्याने आपल्या बळावर टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मागच्या तीन वर्षांपासून तो वनडे क्रिकेटमध्ये एकही शतक झळकवू शकलेला नाही. आता टीम इंडियाचा विकटेकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने टीमच्या एका फलंदाजाला सल्ला दिलाय. दिनेशच्या मते, तो भारताचा पुढचा विराट कोहली बनू शकतो. त्या प्लेयरबद्दल जाणून घेऊया.
दिनेश कार्तिकने ‘त्या’ खेळाडूच घेतलं नाव
दिनेश कार्तिक क्रिकबजशी बोलत होता. दिनेशने श्रेयस अय्यरच नाव घेतलं. “मागच्या काही काळापासून श्रेयसच प्रदर्शन तुम्ही पाहिलं असेल. त्यातून त्याचा आत्मविश्वास दिसतो. यावर्षी त्याने 700 पेक्षा जास्त धावा केल्यात. तो आधी विकेटवर सेट होण्याचा प्रयत्न करतो. श्रेयस स्पिन गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करतो. तो प्रत्येक सामन्यात चांगल प्रदर्शन करतोय” असं दिनेश कार्तिक म्हणाला.
कोहलीसारखं हे काम करावं लागेल
“श्रेयस अय्यरला विराट कोहलीसारखं बनायचं असेल, तर 120-130 धावा करुन नॉटआऊट रहावं लागेल. कोहलीने मागच्या काही वर्षात नाव कमावलय. श्रेयस अय्यर बांग्लादेश विरुद्ध शानदार इनिंग खेळला. जिंकू शकतो, अशा स्थितीत तो टीम इंडियाला घेऊन गेला” असं दिनेश कार्तिक म्हणाला.
शानदार फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू
वर्ष 2022 मध्ये श्रेयस अय्यर शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने वर्ष 2022 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 721 धावा केल्या आहेत. यावर्षी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याने केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने तुफानी शतक झळकावलं होतं. बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या वनडेत 82 धावांची इनिंग खेळला.