IND vs ENG: सेमीफायनल जिंकायची असेल, तर दिनेश कार्तिकला खेळवायचं नाही? विराट याच्या जवळचा माणूस हे काय बोलला?
IND vs ENG: ऋषभ पंतला सेमीफायलमध्ये खेळवा कारण... महत्त्वाचा सल्ला
एडिलेड: टीम इंडिया T20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. शुक्रवारी इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे. इंग्लंड विरुद्ध सामना एडिलेडमध्ये होणार आहे. त्या सामन्यात टीम इंडियाची काय प्लेइंग 11 असेल? त्याची चर्चा आहे. कारण झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने दिनेश कार्तिक ऐवजी ऋषभ पंतला संधी दिली होती. आता सेमीफायनलच्या मॅचमध्ये दिनेश कार्तिकला संधी मिळणार नाही, अशी चर्चा आहे. या विषयावर माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी ऋषभ पंतच नाव घेतलय.
पंत एक्स फॅक्टर ?
“ऋषभ पंतने इंग्लंड विरुद्ध चांगली कामगिरी केलीय. पंतने इंग्लंड विरुद्ध वनडे मॅचमध्ये शानदार इनिंग खेळून विजय मिळवून दिलाय. पंत एक्स फॅक्टर आहे, त्यामुळे मी त्याला संधी देईन” असं रवी शास्त्री म्हणाले.
पंतला टीममध्ये घेण्याचे फायदे काय?
“एडिलेडमध्ये स्क्वेयर बाऊंड्री छोटी आहे. त्याचा फायदा डावखुरा फलंदाज उचलू शकतात. पंत इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण करु शकतो” असं शास्त्री म्हणाले. “इंग्लंडकडे चांगली टीम आहे. त्यांच्याकडे रायटी आणि लेफ्टी फलंदाज आहेत. तुम्हाला तुमच्या टीममध्ये लेफ्टी बॅट्समनची गरज भासेल. तुम्ही 3-4 विकेट्स लवकर गमावल्या, तरी डेथ ओव्हर्समध्ये पंत वेगाने फलंदाजी करु शकतो” असं रवी शास्त्री यांचं मत आहे.
पंत झिम्बाब्वे विरुद्ध फेल
ऋषभ पंतला टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध पहिली संधी मिळाली. पंत फक्त 3 रन्स करुन आऊट झाला. टी 20 मध्ये पंतचा रेकॉर्ड काही खास नाहीय. या खेळाडूने 53 टी 20 सामन्यात 23.21 च्या सरासरीने 964 धावा केल्या आहेत. त्याने फक्त 3 अर्धशतक झळकावली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 127 चा आहे.