टी-20 वर्ल्डकपसाठी दिनेश कार्तिकने ठोकली दावेदारी, पाहा सिलेक्टर्सबद्दल काय म्हणाला
आयपीएल 2024 मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. कार्तिक आता ३८ वर्षांचा आहे. पण त्याने त्याच्या कामगिरीने सर्वांचे मन जिंकले आहे.
Dinesh Kartik : आयपीएल सपंल्यानंतर जून महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या दिनेश कार्तिकने विश्वचषक सुरू होण्यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. दिनेश कार्तिक बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, आयपीएलमध्ये तो शानदार फलंदाजी करत आहे. त्यानंतर अशी आशा व्यक्त केली जात आहे की त्याला टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग बनवले जाऊ शकते.
मी विश्वचषकासाठी 100% देईन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने पुष्टी केली आहे की तो आगामी T20 विश्वचषक 2024 मध्ये खेळण्यासाठी 100 टक्के तयार आहे. 1 जून रोजी टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी 39 वर्षांचा होणारा कार्तिक चमकदार कामगिरी करत आहे. भारताकडून पुन्हा खेळण्याचे स्वप्न त्याने सोडलेले नाही. इंडियन प्रीमियर लीग 2024 दरम्यान, दिनेश कार्तिक इतर भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांपेक्षा वेगाने धावा करत आहे.
काय म्हणाला दिनेश कार्तिक?
कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याच्या संघाच्या लढतीपूर्वी T20 विश्वचषकासाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी भावना असेल. यासाठी मी खूप उत्सुक. या T20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा माझ्या आयुष्यात मोठे काहीही नाही.
कार्तिक म्हणाला की, भारतीय निवड समितीच्या निर्णयाचा तो आदर करेल, पण तो पुन्हा भारतीय रंग परिधान करण्यास 100 टक्के तयार आहे. तो म्हणाला की मला असेही वाटते की विश्वचषकासाठी सर्वोत्तम भारतीय संघ कोणता असावा हे ठरवण्यासाठी तीन अत्यंत स्थिर, प्रामाणिक लोक आहेत – राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि अजित आगरकर. आणि मी पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कार्तिक म्हणाला की मी त्याच्या कोणत्याही निर्णयाचा आदर करतो. पण मी एवढेच सांगेन की, मी 100 टक्के तयार आहे आणि विश्वचषकासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेन.