Rishabh pant | ऋषभ पंतला दुसर आयुष्य देणाऱ्या व्यक्तीच धोनी, युवराजसोबतही खास कनेक्शन
Rishabh pant | ऋषभ पंतच्या कार अपघाताला आज एक वर्ष पूर्ण झालं. मागच्यावर्षी 30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभच्या कारचा भीषण अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. आज एक वर्षानंतर तो या दुखापतीमधून सावरण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे तो लवकरच तो मैदानावर कमबॅक करु शकतो.
मुंबई : ऋषभ पंतला मैदानावर पुनरागमन करायला अजून थोडा वेळ आहे. पण पुनरानगन होणार एवढ नक्की. मागच्यावर्षी 30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. ऋषभ इतक्या मोठ्या भीषण अपघातातून बचावण हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ऋषभला त्यावेळी दुसर आयुष्य मिळालं. ऋषभला हे आयुष्य ज्याच्यामुळे मिळालं, त्या व्यक्तीच नाव आहे, दिनशॉ परदीवाला. ते मुंबईच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये ऑर्थोस्कोपी डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहेत. एकावर्षापूर्वी झालेल्या अपघातानंतर, आज तुम्हाला जो ऋषभ पंत चालता, फिरताना, धावताना दिसतोय, ते परदीवाला यांच्याच प्रयत्नामुळे शक्य झालं.
कोकिळाबेन हॉस्पिटलचे डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनीच अपघातानंतर ऋषभ पंतच्या गुडघ्यावर सर्जरी केली होती. त्यांच्या यशस्वी सर्जरीमुळे ऋषभच्या मैदानावरील पुनरागमनाची अपेक्षा निर्माण झाली. लवकरच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ऋषभ पंत मैदानात खेळताना दिसू शकतो.
त्याचं नात धोनी, युवराज सिंह, सचिन तेंडुलकर सोबतही
डॉक्टरला देवाच रुप म्हणतात. ऋषभ पंतसाठी दिनशॉ परदीवाला हे देवापेक्षा कमी नाहीत. फक्त ऋषभ पंतची सर्जरी करणारे डॉक्टर एवढीच त्यांची ओळख नाही. त्याचं नात धोनी, युवराज सिंह, सचिन तेंडुलकर सारख्या क्रिकेटपटूंसोबतही आहे. म्हणजेच त्यांनी या सर्व क्रिकेटपटूंवर उपचार केलेत. भारतीय क्रिकेटशी दिनशॉ परदीवाला यांचं खास नात आहे.
दुखापतीसह मिळवून दिलं विजेतेपद
IPL 2023 दरम्यान एमएस धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीसह धोनी ही पूर्ण टुर्नामेंट खेळला होता. त्याने टीमला विजेतेपद मिळवून दिलं होतं. टीम चॅम्पियन झाल्यानंतर धोनीने सर्वप्रथम गुडघ्यावर सर्जरी करुन घेतली. ती सर्जरी दिनशॉ परदीवाला यांनीच केली होती.
View this post on Instagram
अन्य भारतीय एथलीट्स बरोबरही नातं
धोनीशिवाय दिनशॉ परदीवाला यांनी युवराज सिंह, सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह सारख्या क्रिकेटपटूंवर सुद्धा उपचार केले आहेत. फक्त क्रिकेटपटूच नाही, तर अन्य भारतीय एथलीट्सवरही त्यांनी उपचार केलेत. 2018 मध्ये त्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल्स जिंकणाऱ्या अशा 12 खेळाडूंची सर्जरी केली होती. यात पी.व्ही.सिंधूपासून सुशील कुमार यांचा समावेश आहे.