Rahul Dravid : टीम इंडिया नाही, दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळण्यासाठी राहुल द्रविड यांनी घेतले होते 34 लाख

Rahul Dravid : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी त्यांनी जवळपास 25000 धावा केल्या आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? द्रविड भारताशिवाय आणखी एका देशासाठी क्रिकेट खेळलेत.

Rahul Dravid : टीम इंडिया नाही, दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळण्यासाठी राहुल द्रविड यांनी घेतले होते 34 लाख
Rahul dravid Image Credit source: Getty
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 8:36 AM

नवी दिल्ली : राहुल द्रविड टीम इंडियाचे विद्यमान हेड कोच आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी त्यांनी जवळपास 25000 धावा केल्या आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? द्रविड भारताशिवाय आणखी एका देशासाठी क्रिकेट खेळलेत. त्यांनी 3 महिन्यांसाठी 34 लाख रुपयात डील डन केली होती. 2003 साली स्कॉटलंडकडून ते वनडे क्रिकेट खेळले होते. फार कमी क्रिकेट चाहत्यांना याबद्दल माहित असेल. राहुल द्रविड कुठल्या देशाकडून खेळले होते? कोणी ही डील घडवून आणली होती? त्या बद्दल जाणून घेऊया.

भारतीय क्रिकेटमध्ये वॉल म्हणून प्रसिद्ध असलेले राहुल द्रविड स्कॉटलंडकडून क्रिकेट खेळले होते. या देशाकडून क्रिकेट खेळण्याची त्यांची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. 2003 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. त्यावेळी जॉन राइट टीम इंडियाचे हेड कोच होते. त्यांचा या डीलमध्ये महत्त्वाचा रोल होता. स्कॉटलंडमध्ये त्यावेळी क्रिकेटची नुकतीच सुरुवात होत होती. 3 वर्षाच्या ट्रायल पीरियडवर स्कॉटलंड साल्टायर्सच्या टीमला नॅशनल लीगमध्ये प्रमोट करण्यात आलं होतं. स्कॉटलंडला काही अनुभवी खेळाडूंची आवश्यकता होती. क्रिकेटच ज्ञान वाढवण्यात मदत करतील, अशा प्लेयर्सच्या ते शोधात होते.

किती लाख द्यायचे ठरले?

आपला शोध संपवण्यासाठी स्कॉटिश क्रिकेट युनियनचे CEO ग्विन जॉन्स यांनी जॉन राइट यांच्याशी संपर्क साधला. एका स्टार खेळाडूला स्कॉटलंडकडून खेळण्यासाठी राजी करणं हा यामागे उद्देश होता. जॉ़न राइट यांनी स्कॉटलंडची ऑफर राहुल द्रविड यांच्यासमोर ठेवली. राहुल द्रविड यांना 3 महिन्यांसाठी 45 हजार पाऊंड म्हणजे 2003 च्या मुल्यानुसार 34.50 लाख रुपयांमध्ये हा करार डन झाला.

स्कॉटलंडसाठी 11 वनडेत ठोकल्या 600 धावा

हा करार झाल्यानंतर राहुल द्रविड 2003 साली स्कॉटलंडकडून नॅशनल क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी उतरले. ते एकूण 12 सामने खेळले. यात 11 वनडे आणि एका टूर गेम होता. पाकिस्तान विरुद्ध ही मॅच झाली होती. राहुल द्रविड स्कॉटलंडकडून 11 वनडे सामने खेळले. 66.66 च्या सरासरीने 600 धावा केल्या. यात 3 शतकं आणि 2 अर्ध शतकं होती. स्कॉटलंडकडून आजही चांगली सरासरी असलेल्या फलंदाजांमध्ये राहुल द्रविड यांचा समावेश होतो.

हे भारतीय खेळाडू सुद्धा खेळलेत स्कॉटलंडकडून

द्रविड यांनी 11 वनडेशिवाय स्कॉटलंडकडून पाकिस्तान विरुद्ध टूर मॅच खेळली. त्यात राहुल द्रविड यांना खातं उघडता आलं नाही. राहुल द्रविडशिवाय आणखी 3 भारतीय खेळाडू स्कॉटलंडकडून क्रिकेट खेळलेत. यात लालाचंद राजपूत, श्रीधरन श्रीराम आणि बुधि कुंधेरन यांचा समावेश होतो.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.