VIDEO: कॅच पकडताना मोठी दुर्घटना, LIVE मॅचमध्ये प्लेयरला स्ट्रेचरवरुन न्याव लागलं बाहेर
त्याचवेळी त्याच्यासोबत एक भयानक दुर्घटना घडली. त्यानंतर त्याला मैदानातून थेट रुग्णालयात नेण्यात आलं. डॉमनिक ड्रेक्सची हालत इतकी खराब होती की, मैदानाबाहेर स्ट्रेचरवरुन न्यावं लागलं.
दुबई : खेळ, खेळाडू आणि इंजरी या तिघांमध्ये कनेक्शन आहे. खेळाडू खेळणार, तर त्याला दुखापत होणार. पण दुखापत अशी ही नको, की ती थेट खेळाडूला रुग्णालयात पोहोचवेल. वेस्ट इंडिजच्या डॉमनिक ड्रेक्सच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. इंटरनॅशनल लीग T20 टुर्नामेंटमध्ये डॉमनिक ड्रेक्स गल्फ जायंट्ससाठी खेळत होता. त्याचवेळी त्याच्यासोबत एक भयानक दुर्घटना घडली. त्यानंतर त्याला मैदानातून थेट रुग्णालयात नेण्यात आलं. डॉमनिक ड्रेक्सची हालत इतकी खराब होती की, मैदानाबाहेर स्ट्रेचरवरुन न्यावं लागलं.
यशस्वी कॅच घेतली, पण….
6 फेब्रुवारीला गल्फ जायंट्स आणि शारजाह वॉरियर्समध्ये सामना झाला. डॉमनिक ड्रेक्स गल्फ जायंट्सकडून खेळत होता. वॉरियर्सच्या इनिंगची 6 वी ओव्हर सुरु होती. वॉरियर्सचा बॅट्समन मोइन अली स्ट्राइकवर होता. त्याने हवेत मोठा फटका मारला. ड्रेक्स वेगान धावत चेंडूच्या दिशेने गेला. त्याने चेंडूच्या दिशेने डाइव्ह मारुन कॅच घेतली. ड्रेक्सने यशस्वी कॅच घेतली, पण त्या प्रयत्नात त्याचं तोंड आणि हात जोरात जमिनीवर आदळले. त्याला प्रचंड वेदना झाल्या.
Brilliance from Drakes!
A #Bawaal catch to dismiss Moeen Ali!#SWvGG #CricketOnZee #DPWorldILT20 #HarBallBawaal pic.twitter.com/mtUDVj4xJm
— Zee Cricket (@ilt20onzee) February 6, 2023
Dominic drakes fall down badly while catching and after that qais ahmad did this #sportsmensprit#uae# pic.twitter.com/7IAbyh4XKW
— Kuldeep Singh (@Kuldeep39584181) February 6, 2023
कॅच नाही सोडली
ड्रेक्सला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर न्यावं लागलं. त्याला थेट रुग्णालयात नेण्यात आलं. ड्रेक्सच्या हेल्थबद्दल ताजी अपडेट नाहीय. दुखापत होण्याआधी ड्रेक्सने कॅच मात्र पकडली. फॅन्स त्याच्या या कॅचच जबरदस्त कौतुक करतायत. डॉमिनिकच्या मेहनतीला सहकाऱ्यांची साथ
डॉमिनिक ड्रेक्सच्या मेहनत त्याच्या सहकाऱ्यांनी वाया जाऊ दिली नाही. डेविड वीजाने पाच विकेट काढले. गल्फ जायंट्सने शारजाह वॉरियर्सला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. शारजाह वॉरियर्सने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये ही टीम 107 रन्सवर ऑलआऊट झाली. गल्फ जायंट्सने हे लक्ष्य तीन विकेट गमावून आरामात पार केलं. पाच विकेट काढणाऱ्या डेविड वीजा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला.