IND vs SL Sunil Gavaskar : जसप्रीत बुमराह सुद्धा आहे, त्याला विसरु नका, गावस्कर असं का म्हणाले?
IND vs SL Sunil Gavaskar : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांच कौतुक केलं आहे.
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांचं कौतुक केलं आहे. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत दीपक चाहर, (Deepak Chahar) भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलने (Harshal Patel) अनुभवी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवू दिली नाही. या युवा वेगवान पेस बॉलर्सनी आपल्या धारदार गोलंदाजीने वेस्ट इंडिजला दणका दिला. भारताने ही टी-20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजांच्या प्रदर्शनाने गावस्कर खूप खूष आहेत. दीपक चाहर एक उत्तम स्विंग गोलंदाज आहे. त्याच्याकडे अतिरिक्त वेग आहे. एक्स्प्रेस गोलंदाज म्हणण्याइतका वेग त्याच्याकडे नाहीय. पण चेंडू योग्य टप्प्यावर टाकून तो फलंदाजांना अडचणीत आणतो.
चेंडू दोन्ही दिशेने स्विंग करतो
दीपक चाहर एक्शनमध्ये कुठलाही बदल न करता चेंडू दोन्ही दिशेने स्विंग करतो. त्यामुळे फलंदाजाला चेंडू खेळताना अडचण येते. भारतासाठी चांगली बाब म्हणजे चाहरसारखा गोलंदाज आहे आणि भुवनेश्वर सारखा गोलंदाज बेंचवर बसला आहे.
भारताने वेस्ट इंडिजला वनडे आणि टी-20 मध्ये 3-0 ने नमवलं. आजपासून लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांना सुरुवात होत आहे. सीरीजमधला पहिला सामना गुरुवारी लखनऊमध्ये खेळला जाईल. या सामन्यात दुखापतग्रस्त चाहर खेळणार नाहीय.
बुमराहला विसरु नका
“बुमराहला विसरु नका. तो सुद्धा संघात आहे. टीम इंडियाच नाही, जगातील कुठल्याही संघात त्याला स्थान मिळू शकतं” असं गावस्करांनी म्हटलं आहे. त्यानंतर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीचा आहेत. म्हणजे अनेक पर्याय आहेत. आराम दिल्यामुळे बुमराह वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीजमध्ये खेळला नाही. आजपासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकतो.
Dont forget jasprit bumrah why sunil gavaskar said this india vs Sri lanka t 20 series