काबूलमध्ये शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर Rashid Khan चं भावनिक आवाहन
शिक्षणाच्या काळजीपोटी राशिद खानने केलेलं अपील खूप महत्त्वाचं आहे.
मुंबई: काबूलमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. त्यावर क्रिकेटपटू राशिद खान आणि रहमत शाह यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. या हल्ल्यात 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. काबूलमध्ये शुक्रवारी शाळेवर आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला. युनायटेड नेशनुसार, यात 46 मुली आणि महिलांचा मृत्यू झाला. काबूलच्या जवळच हजारा आहे, तिथे एका शाळेत हा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यूएन मिशनने दिलेल्या माहितीनुसार, 53 जणांचा मृत्यू झाला. 110 जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
राशिद खानने काय संदेश दिला ?
काबूलमध्ये ICU बाहेर एक किशोरवयीन मुलगी बहिणीची बॅग घेऊन बसल्याचा फोटो ऑनलाइनवर आला होता. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. राशिद खानने एका शालेय मुलीचा फोटो शेयर करुन जनतेसोबत असल्याचा संदेश दिला आहे. त्याने शिक्षणाचा हत्या करु नका असा संदेश दिला आहे. रेहमत खाननेही तोच फोटो पोस्ट करुन हार्ट ब्रेकचा इमोजी पोस्ट केला आहे.
आयपीएलमधून नावारुपाला आला
अफगाणिस्तानातील क्रिकेटपटुंनी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. राशिद खान हा लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. फक्त अफगाणिस्तानातच नाही, तर भारतातही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. लेग ब्रेक गोलंदाजी करणारा राशिद खान आयपीएलमधून नावारुपाला आला.
अफगाणिस्तानच्या टीमकडून अपेक्षा
मागच्या महिन्यात झालेल्या आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानच्या टीमने चांगली कामगिरी केली होती. या महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतही अफगाणिस्तानच्या टीमकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
Kabul ?? ?????? #DontKillEducation ?? pic.twitter.com/mxmRFsswmc
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 30, 2022
अफगाणिस्तानची टीम कुठल्या ग्रुपमध्ये?
टी 20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची टीम ग्रुप 1 मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडची टीम या ग्रुपमध्ये आहे. 22 ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात होणार आहे. इंग्लंड विरुद्ध त्यांचा पहिला सामना होणार आहे.