विरेंद्र सहवागला मुंबई इंडियन्सला पराभूत होताना पाहायचंय, विद्यमान चॅम्पियन्सबद्दल मोठं वक्तव्य

आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी खूप निराशाजनक ठरली आहे.

विरेंद्र सहवागला मुंबई इंडियन्सला पराभूत होताना पाहायचंय, विद्यमान चॅम्पियन्सबद्दल मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 4:22 PM

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी खूप निराशाजनक ठरली आहे. गेल्या हंगामातील चॅम्पियन संघ यावेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. संघ सध्या 11 सामन्यांत पाच विजय आणि 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचे चाहते संघाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. मात्र, भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवागला (Virender Sehwag) मुंबईचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियन होताना पाहायचा नाही. (Don’t want Mumbai Indians to reach top in points table this year, we should get a new champion : Virender Sehwag)

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रवास मुंबई इंडियन्स संघासाठी सोपा राहिलेला नाही. यूएईमध्ये आल्यानंतर त्यांना सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर संघाने पंजाब किंग्जवर विजय मिळवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मुंबई इंडियन्सला तीन सामन्यांच्या रूपात तीन संधी आहेत. जर या संघाने तिन्ही सामने जिंकले तर त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळू शकतं. विरेंद्र सहवागला मात्र हे नको आहे. आयपीएल 2021 मध्ये नवीन चॅम्पियन पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली पाहिजे, असे त्याचे मत आहे.

सहवागला नवा चॅम्पियन पाहायचा आहे

क्रिकबझशी बोलताना माजी भारतीय सलामीवीर म्हणाला, “मुंबई इंडियन्सने या वर्षी अव्वल स्थान गाठावे असे मला वाटत नाही, एक नवीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला पाहिजे आणि आपल्याला नवीन चॅम्पियन मिळायला हवा.” तो बंगळुरू, दिल्ली किंवा पंजाब असू शकतो. प्लेऑफचा रस्ता सध्या मुंबई इंडियन्ससाठी सोपा नाही. याबद्दल सहवाग म्हणाला, ‘मुंबई आयपीएलमधील सर्वोत्तम संघ आहे आणि त्यांना पलटवार कसा करायचा हेदेखील माहित आहे, परंतु मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील, तरच हा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकेल. तथापि, मुंबईसाठी आगामी सर्व सामने इतके सोपे होणार नाहीत.

सर्वोत्तम संघ

सहवाग म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही विजयासाठी धडपडत असता तेव्हा तुम्ही चुकादेखील करता. त्याच चुका तुमच्या पराभवाला कारणीभूत ठरतात, पण मुंबईचा इतिहास पाहता, जेव्हा त्यांचा संघ अशा स्थितीत सापडतो, तेव्हा ते अजून चांगली कामगिरी करतात. पुढच्या मॅचेस म्हणजे मुंबईच्या संघासाठी करा किंवा मरा अशी स्थिती असणार आहेत. जर आपण या संघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सर्वांना वाटेल की, हा संघ इतिहासाची पुनरावृत्ती करु शकेल. पण माझा इतिहासावर जास्त विश्वास नाही.

इतर बातम्या

मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

(Don’t want Mumbai Indians to reach top in points table this year, we should get a new champion : Virender Sehwag)

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.