Rishabh Pant : चुकीला माफी नाही, अखेर ऋषभ पंतवर IPL मध्ये मोठी कारवाई

आयपीएलमध्ये नियमांच खूप कठोरतेने पालन केलं जातं. त्यात जो खेळाडू दोषी असेल, त्याच्यावर कारवाई होते. काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला दुहेरी झटका बसला. आधी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीच्या कॅप्टनसह टीमवर कारवाई करण्यात आली.

Rishabh Pant : चुकीला माफी नाही, अखेर ऋषभ पंतवर IPL मध्ये मोठी कारवाई
Rishabh Pant Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 8:17 AM

IPL 2024 च्या सीजनमध्ये कालचा दिवस दिल्ली कॅपिटल्ससाठी खूपच खराब ठरला. शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमने दिल्ली कॅपिटल्सवर 106 धावांनी मोठा विजय मिळवला. दिल्लीची टीम हरलीच, पण पराभवाच अंतर खूप असल्याने रनरेटमध्ये मोठा फटका बसला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 272 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दिल्लीची टीम 166 रन्सवर ऑलआऊट झाली. KKR च्या सुनील नरेनने दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच दणका दिला. त्याने 39 चेंडूत 85 धावा फटकावल्या. यात 7 फोर, 7 सिक्स होत्या. ऋषभ पंतने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. ऋषभने 25 चेंडूत 55 धावा फटकावल्या. यात 4 फोर, 5 सिक्स होते.

या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला आर्थिक आघाडीवर आणखी एक मोठा धक्का बसला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध स्लो ओव्हर रेट बद्दल दिल्ली कॅपिटल्सवर कारवाई करण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतवर आयपीएलच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली. चालू सीजनमध्ये दिल्लीने षटकांची गती धीमी राखण्याची ही दुसरी वेळ होती. ऋषभ पंतवर 24 लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, चुकांची पुनरावृत्ती केल्यास कठोर दंड ठोठावला जातो.

दिल्लीच्या प्लेयर्सवर काय कारवाई?

इमपॅक्ट प्लेयरसह दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमधील 11 खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला. त्यांना प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा मॅच फी मधील 25 टक्के रक्कम म्हणजे जी कुठली रक्कम कमी असेल, ती कापण्याचे आदेश देण्यात आले. केकेआरने काल यंदाच्या सीजनमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली. याआधी सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 277 धावा केल्या आहेत. 3 सामन्यात सलग 3 विजयांसह केकेआरची टीम पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.