अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात, स्टार क्रिकेटपटू राशीद खानचं कुटुंब अडकलं, इंग्लंडमध्ये धाकधूक

अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर (Afghanistan Crisis) संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या अफगाणिस्तानकडे लागल्या आहेत. दरम्यान क्रिकेटपटू राशिद खानचं (Rashid Khan) कुटुंब अफगाणिस्तानमध्ये अडकल्याने तो मोठ्या चिंतेत आहे.

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात, स्टार क्रिकेटपटू राशीद खानचं कुटुंब अडकलं, इंग्लंडमध्ये धाकधूक
राशिद खान
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 3:18 PM

लंडन : अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही आठवड्यातच तालिबानने सक्रीय होत, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला आहे (Afghanistan and taliban crisis). राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. राष्ट्रपती अशरफ गनी देखील स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांसह देश सोडून पळून गेल्याने अफगाणिस्तानवासी पुरते संकटात अडकले आहेत. दरम्यान अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) हा सध्या इंग्लंडमध्ये असला तरी त्याचं कुटुंब अफगाणिस्तानमध्ये अडकल्याने तो मोठ्या चिंतेत असल्याचं इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसनने (Kevin Pietersen) सांगितलं आहे.

केविनने स्काय स्पोर्ट्ससोबत बोलत असताना ही माहिती दिली. तो म्हणाला, ”राशिद सध्या माझ्यासोबतच इंग्लंडच्या द हंड्रेड (The Hundred) या स्थानिक स्पर्धेत खेळत आहे. सामन्यादरम्यानच त्याने माझ्याशी बराच वेळ बातचीत केली. यावेळी त्याचे कुटुंब अफगाणिस्तानमध्ये अडकले असून तेथील तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वादामुळे त्यांना बाहेर पडता येत नसल्याचं त्यानं सांगितलं. विमानाने तो त्यांना बाहेर देशात पोहचवू इच्छितो पण सध्याच्या परिस्थितीमुळे विमान सेवेवरही परिणाम झाल्याचे त्याने सांगितले.” तसेच केविन राशिदच्या खेळाबाबत बोलताना म्हणाला, ”सध्याची परिस्थिती राशिदसाठी खूप कठीण आहे. पण अशावेळी देखील तो संघासाठी खेळत असून द हंड्रेड स्पर्धेतील ही सर्वात हृदयस्पर्शी कथा आहे.”

राशिदची भावनिक पोस्ट

अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या सर्व परिस्थितीमुळे तणावाखाली असणाऱ्या राशिदने त्याच्या इन्स्टास्टोरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने रडण्याचे इमोजी टाकत मी नीट झोपूही शकत नाही असं लिहिलं आहे.

Rashid khan insta story

राशिद खानची इन्स्टाग्राम स्टोरी

काय घडतंय अफगाणिस्तानमध्ये?

अफगाणिस्तानातील तालिबान्यांविरोधात कारवाई करण्यासाठी अमेरिकेचं सैन्य वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 2001 मध्ये दाखल झालं होतं. अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टप्प्याटप्यानं अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून हटवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेचं सैन्य कमी झाल्याची संधी साधत देशाच्या ग्रामीण भागात मर्यादित असेलेल्या तालिबाननं आक्रमक पवित्रा घेतला. तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यात एका बाजूला चर्चा सुरु होती. दुसरीकडे तालिबान एका मागोमाग शहरं ताब्यात घेत होता. अफगाणिस्तानातील 34 प्रातांपैकी 28 प्रांत तालिबाननं 15 ऑगस्टपर्यंत ताब्यात घेतले होते. तर, रविवारी जलालाबाद आणि काबूलवर ताबा घेत तालिबानं पुन्हा सत्ता मिळवलीय.तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरदार हे देशाचे नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ ठेवू शकतं.

हे ही वाचा

Afghanistan Crisis : नवा राष्ट्रपती थेट देशाचं नाव बदलण्याची चिन्हं, अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?

(Due to Afghanistan and taliban crisis Cricketer rashid khan in tension say Kevin Pietersen)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.