तालिबानकडून IPL बॅन, चिअर लीडर्स डोळ्यात खुपतात? अफगाणिस्तानमध्ये आयपीएलचे ढोल थंडच
तालिबानची सत्ता आल्यानंतरही अफगाणिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभाग घेत आहेत. मात्र या सामन्यांचे प्रक्षेपण मात्र अफगाणिस्तानमध्ये कुठेच होणार नाही.
दुबई: युएईमध्ये रविवारपासून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या सामन्याने आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वाला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी टी20 लीग असणाऱ्या आय़पीएलचे चाहते जगभरात आहेत. कोरोनामुळे मधूनच स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुन्हा सुरु होण्यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान अफगाणिस्तानमधील क्रिकेटप्रेमी मात्र या सामन्यांची मजा उचलू शकत नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे स्टार खेळाडू राशिद खान (Rashid Khan), मोहम्मद नबी (Mohammed Nabi) यांसारखे खेळाडू खेळत असतानाही अफगाणिस्तानवासी त्यांना पाहू शकणार नाहीत.
काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये अनेक मोठ्या घडामोडी झाल्या. बराच काळापासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांना दूर ठेवण्यासाठी असणारं अमेरिकी सैन्य पुन्हा मायदेशी परतलं. त्यानंतर काही दिवसांतच तालिबनने एक एक करत संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. राष्ट्राध्यक्ष देश सोडून जाताच तालिबानचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर अनेक नियम बदलले गेले. याच काही नियमांनुसार आता तालिबानमध्ये आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बंदी आणण्यात आली आहे.
चीअर लीडर्स हे मुख्य कारण
तालिबान सरकारच्या मते आयपीएलमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या इस्लामिक मूल्यांचं उल्लघंन करतात. यातीलच एक मोठी गोष्ट म्हणजे सामन्यांदरम्यान चीअर ली़डर्सना नाचवलं जातं. तसंच सामना पाहायला आलेल्या अनेक महिलांनी हीजाब परिधान केलेला नसतो अर्थात तोंड झाकलेलं नसतं. या सर्व कारणांमुळे आयपीएलच्या प्रक्षेपणावर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये बंदी घातली आहे.
Afghanistan national ? ? will not broadcast the @IPL as usual as it was reportedly banned to live the matches resumed tonight due to possible anti-islam contents, girls dancing & the attendence of barred hair women in the ?️ by Islamic Emirates of the Taliban. #CSKvMI pic.twitter.com/dmPZ3rrKn6
— M.ibrahim Momand (@IbrahimReporter) September 19, 2021
तालिबानचा क्रिकेट संघाला पाठिंबा
अफगाणिस्तानी वृत्तसंस्था आरियाना न्यूजच्या रिपोर्टनुसार तालिबानचा नेता अनस हक्कानी याने काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी आणि क्रिकेट बोर्डचे माजी अधिकारी असदुल्लाह आणि नूर अली जादरान यांची भेट घेतली. यावेळी हक्कानी यांनी 1996 ते 2001 या त्यांच्या सत्तेतच देशात क्रिकेटची सुरुवात झाली असून आमचा क्रिकेटला कायम पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलं. हक्कानी यांनी पुढे बोलताना सांगितले, ”तालिबान देशातील क्रिकेटपटूंच्या पाठीशी कायमच आहे. तसेच त्यांच्या अडचणींसाठी सर्व हवी ती कारवाई देखील आम्ही करणार आहे.” दरम्यान यावेळी उपस्थित क्रिकेटपटूंनी हक्कानी आणि त्यांच्या साथीदारांचे आभार मानले. तसंच तालिबान देशातील क्रिकेटला कायम असाच पाठिंबा देईल अशी आशाही व्यक्त केली.
हे ही वाचा :
IPL 2021: दुखापतग्रस्त रायडूबद्दल मोठी अपडेट, पत्रकार परिषदेत समोर आली माहिती
या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया
IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार
(Due to anti islamic content IPL wont be telecasted in afghanistan)