IPL 2022: प्रमुख गोलंदाजाला 4 महिने क्रिकेटपासून दूर रहाण्याचा सल्ला, CSK चं नाही टीम इंडियाचही T 20 World cup चं समीकरण बिघडणार

IPL 2022: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग सीजनमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्स आपल्या एका प्रमुख गोलंदाजाविना खेळतेय. चेन्नईची सध्याची कामगिरी पाहता, CSK ला या प्रमुख गोलंदाजाची उणीव प्रकर्षाने जाणवतेय.

IPL 2022: प्रमुख गोलंदाजाला 4 महिने क्रिकेटपासून दूर रहाण्याचा सल्ला, CSK चं नाही टीम इंडियाचही T 20 World cup चं समीकरण बिघडणार
टीम इंडिया Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 4:15 PM

मुंबई: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग सीजनमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्स आपल्या एका प्रमुख गोलंदाजाविना खेळतेय. चेन्नईची सध्याची कामगिरी पाहता, CSK ला या प्रमुख गोलंदाजाची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या गोलंदाजाचं नाव आहे दीपक चाहर. गोलंदाजी बरोबर फलंदाजी करण्याचीही त्याची क्षमता आहे. त्यामुळे ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. दीपक चाहर (Deepak chahar) अजून चार महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीय. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये दीपक चाहर खेळताना दिसणार नाहीय. त्याचवेळी T-20 वर्ल्डकपमध्येही त्याच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स कायम आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धेत दीपक चाहरचं खेळणं कठीण दिसतय, असं टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. दीपक चाहरच्या दुखापतीचं स्कॅनिंग झालं आहे. त्याला अजून चार महिने क्रिकेटपासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात आलाय. दीपक चाहर आता पाठीच्या दुखण्यानेही त्रस्त आहे.

गोलंदाजी सुरु केली होती, पण…

दीपक चाहरला आधी हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलच्या मध्यावर कमबॅक करेल, असं वाटत होतं. NCA त नेट्समध्ये त्याने गोलंदाजीही सुरु केली होती. पण आता पाठीच्या दुखण्यामुळे CSK च्या महागड्या खेळाडूला आयपीएलच नाही, तर पुढचे चार महिने क्रिकेटपासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे.

दुखापतीमुळे बिघडणार समीकरण

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये दीपक चाहरला 14 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. पण स्पर्धेमध्ये खेळण्याआधीच त्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीने चेन्नईच्या टीमचं समीकरणचं बिघडवून टाकलं. दीपक चाहर आता टी 20 वर्ल्डकप मध्ये खेळला नाही, भारतीय संघाचं गणितही बिघडू शकतं. दीपक चाहरच्या असण्याने मधल्याफळीलाही बळकटी मिळते. कारण गोलंदाजी बरोबर तो चांगली फलंदाजी सुद्धा करतो. दीपक चाहर सध्या एनसीएमध्ये असून तो दुखापतीवर मात करुन फिट होण्यावर मेहनत घेत आहे. तो सध्या क्रिकेटच्या मैदानापासून लांबच आहे. पण तो पुनरागमन करेल, तेव्हा त्याची कामगिरी कशी असेल याचीही उत्सुक्ता आहे.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.