Virat Kohli IPL 2023 : Naveen ul haq ने विराट कोहलीच नाही, केएल राहुलची सुद्धा नाही ठेवली इज्जत, VIDEO

Virat Kohli IPL 2023 : नवीन उल हकने आपलाच कॅप्टन केएल राहुलबरोबर असं काय केलं?. काल मॅच संपल्यानंतर घडलेल्या या राड्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक हे तिघे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत.

Virat Kohli IPL 2023 : Naveen ul haq ने विराट कोहलीच नाही, केएल राहुलची सुद्धा नाही ठेवली इज्जत, VIDEO
ipl 2023 virat kohli-naveen ul haqImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 3:36 PM

लखनौ : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्सचा सामना खेळापेक्षा वादामुळे जास्त चर्चेत आहे. या मॅचमध्ये विराट कोहली आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हक भिडले. गौतम गंभीर बरोबर सुद्धा विराट कोहलीच वाजलं. महत्त्वाच म्हणजे नवीन उल हकने आपलाच कॅप्टन केएल राहुलची सुद्धा इज्जत ठेवली नाही.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात नवीन उल हक आपला कॅप्टन केएल राहुलने सुद्धा सांगितलेलं ऐकायला तयार नाहीय. व्हिडिओमध्ये केएल राहुल विराट कोहली सोबत उभा आहे. त्याने नवीन उल हकला बोलावलं.

राहुलची काय इच्छा होती?

नवीन उल हकने विराट कोहलीची माफी मागून विषय संपवावा, अशी केएल राहुलची इच्छा होती. पण नवीन उल हकने इन्कार केला. केएल राहुलने नवीन उल हकला बोलावलं. पण त्याने हात हलवून पलटी मारली. राहुल आणि विराट दोघे नवीनकडे पाहत होते, तो काय करतोय ते.

विराटने नवीनला बूट दाखवले

विराट आणि नवीन उल हक या दोघांपासूनच सर्व वादाची सुरुवात झाली. नवीन बॅटिंग करत असताना, दोघांच भांडण झालं. विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये वाद झाल्यानंतर अंपायर्सना मध्यस्थी करावी लागली. त्यावेळी विराटने नवीनकडे पाहून आपले बूट दाखवले.

तिघांना चुकवावी लागली किंमत

मॅच संपल्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये पुन्हा वाद झाला. या भांडणानंतर गौतम गंभीर लगेच तिथे आला. त्याने विराट कोहलीला काहीतरी सांगितलं. दोन्ही खेळाडू आक्रमक झाले होते. त्यानंतर अन्य खेळाडूंनी मध्येपडून दोघांना दूर केलं. या भांडणाचा तिघांवर साइड इफेक्ट झाला. बीसीसीआयने विराट आणि गंभीरच्या मॅच फी मधून 100 टक्के रक्कम कापली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.