भारत-पाकिस्तान मॅचवरुन इंग्लंडच्या रस्त्यावर हिंदू-मुस्लिम हिंसाचार
एका मॅचचा वाद भयानक हिंसाचारात बदलला, इंग्लंडच्या रस्त्यावर काय घडतय? जाणून घ्या...
मुंबई: क्रिकेटला जंटलमन्स गेम म्हटलं जातं. पण काही वेळा चाहत्यांच्या अतिउत्साहामुळे गालबोट लागतं. मैदानावर किंवा मैदानाबाहेर प्रेक्षकांमध्ये होणारे वाद हिंसाचारात बदलतात. विषय अनेकदा हाताबाहेर निघून जातो. त्यामुळे परिस्थिती हाताळणं कठीण होऊन बसतं. सध्या क्रिकेटमुळे इंग्लंडच्या रस्त्यावर असच दृश्य आहे. इंग्लंडच्या लीसेटस्टरमध्ये तणाव आहे. तिथे हिंदू-मुस्लिमांमध्ये हिंसाचार सुरु आहे.
पोलिसांवर हल्ला
हिंदू-मुस्लिमांमधील हा हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांनी तातडीन पावलं उचलली. त्यावेळी त्यांच्यावर काचेच्या बॉटल्स फेकण्यात आल्या. हातात दांडुके घेऊन समाजकंटकांनी गोंधळ घातला. मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
वादाची सुरुवात कधी झाली?
28 ऑगस्टला आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाला. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना हा पराभव सहन झाला नाही. तेव्हापासून या सर्व वादाची सुरुवात झाली. दोन्ही बाजूचे क्रिकेट चाहते आमने-सामने आले. या वादाने कधी हिंदू-मुस्लिम रंग घेतला, ते समजलच नाही.
हिंसाचार अजूनही सुरुच
लीसेस्टर पोलीस अशा प्रकारचा हिंसाचार मोडून काढण्यासाठी तयार नव्हते. पण आता त्यांनी कंबर कसली आहे. दोन्ही बाजुंच्या उपद्रवींकडून अजूनही हिंसाचार सुरु आहे. संपूर्ण लीसेस्टरमध्ये तणाव आणि दहशतीच वातावरण आहे.
पोलिसांकडून जनतेला आवाहन
अनेकांना ताब्यात घेण्यात आलय. लीसेस्टर लंडनपासून 160 किमी अंतरावर आहे. तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांना लोकांना शांतता बाळगण्याच आवाहन केलय.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
हिंसाचार करणाऱ्यांनी मास्क घातलं होतं, असं प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं. ते झुंडीने आले. त्यांना पाहून, फुटबॉलची मॅच पाहून एखादा गट येतोय, असं वाटलं. लीसेस्टरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पोलिसांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.