Duleep Trophy: भांडण पाहून अजिंक्य रहाणेची सटकली, फायनलच्या हिरोलाच मैदानाबाहेर काढलं, पहा VIDEO
Duleep Trophy: दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? शांत-संयमी रहाणे इतका का संतापला?
मुंबई: मॅच सुरु असताना कुठल्याही कॅप्टनला आपला स्टार खेळाडू मैदानावर हवा असतो. पण काही वेळा दुखापतीमुळे खेळाडूला बाहेर बसाव लागतं. फायनलमध्ये मॅचविनर खेळाडू बाहेर असेल, तर तो संपूर्ण टीमसाठी एक झटका असतो. दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज या उलट घडलं.
स्टार खेळाडूला बाहेर काढलं
स्टार खेळाडूला कुठलीही दुखापत झाली नव्हती. पण अजिंक्य रहाणेने फायनलमध्ये स्टार ठरलेल्या खेळाडूला मैदानाबाहेर काढलं. दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये रहाणेच्या नेृत्वाखील वेस्ट झोनने साऊथ झोनवर 294 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
त्याचं वेस्ट झोनच्या विजयात महत्त्वाच योगदान
फायनल मॅचच्या शेवटच्या दिवशी अजिंक्य रहाणेने बोल्ड पाऊल उचललं. त्याने आपल्या टीममधील स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर पाठवलं. यशस्वी जैस्वाल फायनलचा हिरो ठरला. त्याने 265 धावांची इनिंग खेळून वेस्ट झोनच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
रवी तेजाबरोबर वाद
जैस्वाला सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी यशस्वी जैस्वालचा साऊथ झोनचा खेळाडू रवी तेजाबरोबर शाब्दीक वाद झाला. अंपायरने जैस्वालच्या वर्तनाची कॅप्टन रहाणेकडे तक्रार केली.
आधी समजावलं, पण…
यशस्वी जैस्वालच वर्तन पाहून अजिंक्य रहाणे संतापला. त्याने आधी यशस्वी जैस्वालला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण 20 वर्षांचा जैस्वाल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. रवी तेजाबरोबर त्याच भांडण सुरुच होतं.
अजिंक्य रहाणेच कौतुक
त्यानंतर अजिंक्य रहाणेचा पारा चढला. त्याने जैस्वालचा हात खाली घेतला व त्याला मागे ढकलल. त्यानंतर मैदानाबाहेर काढलं. अजिंक्य रहाणेने मैदानात घेतलेल्या या भूमिकेच आता कौतुक होतय. जैस्वालसाठी हा एक धडा आहे.
Here’s the video of what apparently was the last straw that led to West Zone’s Yashasvi Jaiswal (who scored 265 yesterday) being ordered off the field by his skipper Ajinkya Rahane https://t.co/Cd17p7cl1P
— Rick Eyre on cricket (@rickeyrecricket) September 25, 2022
पिछाडीवरुन विजय
या मॅचमध्ये वेस्ट झोनची टीम पहिल्या डावात पिछाडीवर होती. त्यानंतर दुसऱ्याडावात यशस्वी जैस्वालाने डबल सेंच्युरी झळकवली. त्या बळावर वेस्ट झोनने 529 धावांचा डोंगर उभारला. साऊथ झोनचा दुसरा डाव 234 धावात आटोपला.