IND vs AUS : फुल ठसन, Virat Kohli आपल्याच वक्तव्यावरुन पलटला, हा घ्या पुरावा VIDEO

IND vs AUS 3rd ODI : विराट बोलला, तसं अजिबात वागला नाही, फुल टशन, एकदा बघा. अग्रेशन ही विराट कोहलीची ओळख आहे. चेन्नई वनडेत पुन्हा एकदा विराट कोहलीच आक्रमक रुप पहायला मिळालं.

IND vs AUS :  फुल ठसन, Virat Kohli आपल्याच वक्तव्यावरुन पलटला, हा घ्या पुरावा VIDEO
ind vs ausImage Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 10:58 AM

IND vs AUS 3rd ODI : भारतीय टीमचा स्टार खेळाडू विराट कोहलीच ऑस्ट्रेलियन टीमसोबत एक वेगळं नातं आहे. कधी तो ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मजा-मस्ती करताना दिसतो. कधी त्यांच्यासोबत धक्का-बुक्की करतो. काही दिवसांपूर्वी विराट कोहली एका पत्रकार परिषदेत बोलला होता, ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबतच नातं आता बदलल आहे. त्यांच्यासोबत मैत्री झालीय. पण चेन्नईत तिसऱ्या वनडे मॅच दरम्यान असं काही घडलं की, त्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

विराट कोहलीचा जशास तस उत्तर देणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश होतो. त्याच्यासोबत मैदानात पंगा घेणं, अनेकदा खेळाडूंना महाग पडतं. कोहली त्याच्या अग्रेशनमुळे अन्य खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. बुधवारी चेन्नईच्या स्टेडियममध्ये खेळाडूंना कोहलीच हेच अग्रेशन पहायला मिळालं. कोहली थेट स्टॉयनिसला भिडला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

21 व्या ओव्हरची ही घटना आहे. मार्कस स्टॉयनिस गोलंदाजी करत होता. राहुल स्ट्राइकवर होता. तो चेंडूला सामोरा गेला, पण एकही धाव केली नाही. स्टॉयनिस दुसरा चेंडू टाकायला चाललेला, त्यावेळी नॉन स्ट्रायकर एन्डकडून कोहली येत होता. कोहली स्टॉयनिसच्या समोर येताच, दोघांनी परस्परांना खांद्याने धडक दिली. कोहली ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे रागाने पाहू लागला. कोहली भडकलाय, हे स्टॉयनिसला समजलं. तो पुढे जाऊन हसायला लागला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत दिसली मैत्री

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान विराट कोहलीची ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैत्री झाल्याच चित्र दिसलं होतं. स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन बरोबर तो चर्चा करताना दिसलेला. नाथन लायन बरोबर सुद्धा त्याने बऱ्याच गप्पा मारल्या. वनडे सीरीज येताच कोहलीचा अंदाज बदलला. कोहलीच्या सर्वाधिक धावा

काल वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग केली. त्यांनी विजयासाठी 270 धावांच टार्गेट दिलं. टीम इंडियाचा डाव 248 धावांवर आटोपला. टेस्ट सीरीज टीम इंडियाने 2-1 ने जिंकली होती. पण वनडे सीरीज ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली. शेवटच्या चेन्नई वनडेमध्ये विराट कोहलीनेच टीम इंडियाकडून सर्वाधिक 54 धावा केल्या.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.