17 दिवसात खेळला 3 टेस्ट मॅच, भारत दौरा सुरु असताना एका ऑस्ट्रेलियन प्लेयरची निवृत्तीची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा खेळाडू फक्त 17 दिवस राहिला. या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 17 दिवसात ऑस्ट्रेलियासाठी हा खेळाडू 3 टेस्ट मॅच खेळला. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा खेळाडू कोण आहे?.

17 दिवसात खेळला 3 टेस्ट मॅच, भारत दौरा सुरु असताना एका ऑस्ट्रेलियन प्लेयरची निवृत्तीची घोषणा
Cricket australiaImage Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 12:51 PM

सिडनी : ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु आहे. सीरीजचा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना बाकी आहे. या दरम्यान एका ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या निवृत्तीची बातमी चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा खेळाडू फक्त 17 दिवस राहिला. या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 17 दिवसात ऑस्ट्रेलियासाठी हा खेळाडू 3 टेस्ट मॅच खेळला. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा खेळाडू कोण आहे?. ऑस्ट्रेलियन प्लेयर ट्रेंट कोपलँडने निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्रेंट कोपलँडने एक वेगवान गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज बनणयाआधी ट्रेंट कोपलँड विकेटकीपर होता.

विकेटकिपींग सोडून वेगवान गोलंदाज बनला

ट्रेंट कोपलँडला विकेटकीपिंग सोडून वेगवान गोलंदाज बनण्यासाठी त्याच्या कोचने प्रेरित केलं. ट्रेंटकडे चांगली उंची होती. 1.95 मीटर लांब कोपलँडने कोचचा सल्ला मानून वेगवान गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. यात त्याला चांगलं यश मिळालं. एक वेगवान गोलंदाज म्हणून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरीच वर्ष खेळला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला तितकं यश मिळालं नाही.

निवृत्तीचा निर्णय का घेतला?

36 वर्षांचा ट्रेंट देशांतर्गत क्रिकेटमध्ये 14 वर्ष खेळला. या दरम्यान त्याने 112 फर्स्ट क्लास मॅच आणि 29 लिस्ट ए चे सामने खेळला. आपल्या धारदार गोलंदाजीने त्याने 410 फर्स्ट क्लास विकेट आणि लिस्ट ए मध्ये 41 विकेट काढले. “मी सीजन सुरु होण्याआधीच निवृत्तीचा विचार करत होतो. मी आता 37 वर्षांचा होईन. मला वाटतं ही योग्य वेळ आहे. युवा खेळाडूंसाठी जागा झाली पाहिजे. मी क्रिकेटमध्ये जे काही मिळवलं, त्याचा मला अभिमान आहे. मला माझ्या क्रिकेट करिअरमध्ये माझ्या कुटुंबाकडून पाठबळ मिळालं” असं ट्रेंट कोपलँडने सांगितलं. 17 दिवसात 3 कसोटी सामने आणि करिअर संपलं

ट्रेंट कोपलँड ऑस्ट्रेलियाकडून 3 कसोटी सामने खेळला. या दरम्यान त्याने 6 विकेट काढल्या. हे तीन कसोटी सामने तो 2011 साली श्रीलंकेविरुद्ध त्यांच्याच भूमीवर खेळला होता. 17 दिवसात तो हे तीन कसोटी सामने खेळला. त्याने 31 ऑगस्ट 2011 ला टेस्ट डेब्यु केला. 16 सप्टेंबर 2011 रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.