Rohit Sharma | खरच रोहित मानलं तुला, अश्विनच्या डोळ्यात अश्रू होते…त्यावेळी जे केलं त्याला सलाम
Rohit Sharma | अश्विनच्या डोळ्यात अश्रू होते, त्यावेळी रोहित शर्मा खंबीरपणे पाठिशी उभा राहिला. रोहितने जे केलं, त्याला तोड नाही. हे वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा रोहितचा अभिमान वाटेल. एक चांगला व्यक्ती, मित्र, संघ सहकारी लागतो, तो यासाठीच. कठीण काळात अश्विनला फक्त धीर देऊनच रोहित शर्मा थांबला नाही.
Rohit Sharma | इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाने 4-1 ने विजय मिळवला. पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाने सलग चार कसोटी सामने जिंकले. या मालिका विजयासह टीम इंडियाने टेस्ट रँकिंग आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपमध्ये पहिल स्थान मिळवलं. टीम इंडियाच्या या विजया दरम्यान आर.अश्विनच्या घरी इमर्जन्सीची स्थिती निर्माण झाली होती. त्याच्या आईला ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे अश्विनला राजकोट टेस्ट सोडून चेन्नईला जाव लागलं. अखेर त्या दिवशी काय झालेलं? कोणी सर्वात जास्त मदत केली? याचा खुलासा स्वत: अश्विनने केलाय. अश्विनने सांगितलं, त्या दिवशी रोहित शर्माने त्याची सर्वात जास्त मदत केली होती. एखादा माणूस दुसऱ्या बद्दल इतका विचार करु शकतो, यावर अश्विनला विश्वास बसत नाहीय.
अश्विनने यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं की, राजकोट टेस्ट दरम्यान आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल केला होता. त्याला आपल्या आईला पहायच होतं. पण डॉक्टरांनी अश्विनला सांगितलं की, आईची तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ कॉलमधून दाखवता येणार नाही. त्यानंतर अश्विनच्या डोळ्यात पाणी आलं. काहीवेळाने अश्विनच्या खोलीत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड आले. अश्विन टेन्शनमध्ये होता. कारण त्याला राजकोट बाहेर जाण्यासाठी कुठल विमान मिळत नव्हतं. त्याला लगेच चेन्नईला जायच होतं. त्यानंतर रोहित शर्माने अश्विनसाठी विशेष चार्टेड विमानाची व्यवस्था केली. दोघांना अश्विनसोबत ठेवलं. रोहितने अश्विनसाठी हे जे काही केलं, त्याने सगळेच स्तब्ध झाले.
Watch how Rohit Sharma cared for Ash.
The Emotional Rollercoaster @ashwinravi99 went through between picking his 500th and heading back home.
Part II of Bazball x Jamball is out! Video link below! 👇🏻https://t.co/uveFhON41m pic.twitter.com/Rf97OAULSO
— Crikipidea (@crikipidea) March 12, 2024
अश्विनचा रोहितला सलाम
अश्विनने याबद्दल रोहित शर्माच भरभरुन कौतुक केलं. रोहितसारखा माणूस मी पाहिला नाही, असं अश्विन म्हणाला. “रोहित मनाने खूप चांगला आहे. त्याच्याकडे पाच आयपीएल टायटल आहेत. हे इतक सोपं नाहीय. त्याला यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे. देव त्याला देईलच. या मतलबी दुनियेत एक माणूस असाही आहे, जो दुसऱ्याबद्दल इतका विचार करतो. असं फार कमी बघायला मिळतं”