Jofra Archer IPL 2023 : सीजन सुरु असताना आर्चर मुंबई इंडियन्सची साथ सोडून कुठे गेलेला? महत्वाची माहिती समोर
Jofra Archer IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून 7 पैकी फक्त 2 सामनेच खेळलाय. सीजन सुरु असतानाच जोफ्रा आर्चर टीमची साथ सोडून गेला होता, अशी माहिती समोर आलीय. जोफ्रा आर्चरच्या बाबतीत काही महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
Jofra Archer IPL 2023 : IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम आतापर्यंत 7 मॅच खेळली आहे. त्यात जोफ्रा आर्चर फक्त 2 मॅचमध्ये खेळलाय. आर्चर सलग सामने का खेळत नाहीय? त्यामागे काय कारण आहे? ते समोर आलय. जोफ्रा आर्चरची नुकतीच एक सर्जरी झालीय. आयपीएलचा हा 16 वा सीजन सुरु आहे. सीजन चालू असतानाच मध्यावरच आर्चर मुंबई इंडियन्सची साथ सोडून बेल्जियमला निघून गेला होता.
जोफ्रा आर्चरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये दुखापत झाल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला तो उपचारासाठी बेल्जियमला निघून गेला. तिथे त्याच्यावर एक सर्जरी झाली. द टेलीग्राफने हे वृत्त दिलय.
आर्चर पहिला सामना कधी खेळला?
बातमीत म्हटलय त्यानुसार, या सर्जरीमुळेच जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्ससाठी सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. मागच्या 25 महिन्यातील त्याची ही 5 वी सर्जरी आहे. IPL 2023 मध्ये RCB विरुद्ध तो पहिला सामना खेळला होता. या सामन्यात 33 रन्स देऊन त्याला एकही विकेट मिळाला नव्हता.
2 एप्रिलनंतर जोफ्रा आर्चर किती दिवस गायब?
2 एप्रिलला जोफ्रा आर्चर पहिला सामना खेळला. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या पुढच्या चार सामन्यात तो दिसला नाही. सीजनमधील दुसरा सामना तो 20 दिवसानंतर 22 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध खेळला. या मॅचमध्ये त्याने 42 रन्स देऊन 1 विकेट काढला. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्धच्या पुढच्या सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली.
View this post on Instagram
मुंबई इंडियन्सच नाही, इंग्लंडची टीम सुद्धा टेन्शनमध्ये
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. या मॅचमध्ये आर्चर खेळणार की, नाही? या बद्दल काही स्पष्टता नाहीय. फक्त मुंबई इंडियन्सच नाही, इंग्लंडची क्रिकेट टीम सुद्धा टेन्शनमध्ये आहे. इंग्लंड टीमला ऑस्ट्रेलिया विरुद्ध Ashes मालिका खेळायची आहे. या सीरीजला अजून 6-7 आठवडे बाकी आहेत. आर्चरला पहिल्यांदा दुखापत कधी झाली?
इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मेडिकल टीम मुंबई इंडियन्स फ्रेंचायजीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यांची आर्चरच्या रिकव्हरीवर नजर आहे. वर्ष 2021 मध्ये जोफ्रा आर्चरच्या कोपराला दुखापत झाली होती. तपासामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याच निष्पन्न झालं. त्यानंतर आर्चरला T20 वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या Ashes सीरीजमध्ये खेळता आलं नव्हतं.