Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीने मैदानात राडा घातला, पण त्याच्या एका कृतीने जिंकलं मन

Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीने मैदानात भांडणाशिवाय दुसरं असं काय केलं?. विराट कोहली आक्रमक असला, तरी आपल्या चाहत्यांच्या बाबतीत तो तितकाच मोठ्या मनाचा आहे.

Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीने मैदानात राडा घातला, पण त्याच्या एका कृतीने जिंकलं मन
ipl 2023 virat kohli Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 9:50 AM

लखनौ : लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सामन्यात काल जे घडलं, त्याचा सर्व फोकस विराट कोहलीवर आहे. विराट या सर्व वादाच्या केंद्रस्थानी आहे. विराट कोहलीवर चहूबाजून टीका सुरु आहे. कारण विराट कालच्या सामन्यात खूपच आक्रमक झाला होता. त्याने एकट्याने लखनौ सुपर जायंट्सच्या तिघांबरोबर पंगा घेतला. विराट कोहली चूक की बरोबर याची सोशल मीडियावर रंगली आहे.

या सगळ्यामध्ये विराट कोहलीने मैदानावर अशी सुद्धा एक कृती केली, ज्याने चाहत्यांच मन जिंकून घेतलं. विराट कोहली खडूस वाटतो. पण चाहत्यांच्या बाबतीत विराट तितकाच मोठ्या मनाचा देखील आहे.

विराटची फॅन फॉलोइंग एका वेगळ्या लेव्हलची

विराट कोहलीचे चाहते जगभरात विखुरलेले आहेत. विराट कोहलीची फॅन फॉलोइंग एका वेगळ्या लेव्हलची आहे. कोहलीचे चाहते त्याची मॅच पाहण्यासाठी कुठेही पोहोचतात. सध्या विराटची आयपीएलमध्ये धूम आहे. काल 1 मे रोजी लखनौच्या इकाना स्पोर्टस स्टेडियमवर लखनौ आणि RCB मध्ये सामना रंगला होता.

इकानावर सुद्धा चिन्नास्वामी इतकच प्रेम मिळालं

या मॅचमध्ये विराट कोहलीची क्रेज पहायला मिळाली. इकाना स्टेडियमवरही विराटला एम चिन्नास्वामी स्टेडियम इतकच प्रेम मिळालं. एक फॅन, तर सामना सुरु असताना विराट कोहलीच्या पाया पडण्यासाठी मैदानात धावत आला.

चाहता धावत आला, मग विराटने काय केलं?

लखनौ आणि आरसीबीमध्ये सामना सुरु असताना एका चाहता मैदानात घुसला. त्याने मैदानात येऊन विराट कोहलीचे पाय पकडले. विराट बद्दल हा चाहता आपलं प्रेम व्यक्त करत होता. फॅनने विराटचे पाय पकडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विराटने लगेच त्या चाहत्याला उचललं व त्याची गळाभेट घेतली.

भारतीय टीमचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी आणि रोहित शर्माला भेटण्यासाठी सुद्धा चाहते अनेकदा मैदानात धाव घेतात. फुटबॉलच्या मैदानात अनेकदा लियोनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डोबद्दल अशी क्रेझ पहायला मिळते.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.