RCB vs RR 2023 : किती तो राग, Mohammed Siraj ची आपल्याच टीमच्या खेळाडूला शिवीगाळ, VIDEO Viral

RCB vs RR IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने राजस्थान रॉयल्सला काल हरवलं. पण मोहम्मद सिराजने आपल्याच टीमच्या प्लेयरला शिवीगाळ केली. सामन्या दरम्यान मोहम्मद सिराजच स्वत:वरील नियंत्रण सुटलं.

RCB vs RR 2023 : किती तो राग, Mohammed Siraj ची आपल्याच टीमच्या खेळाडूला शिवीगाळ, VIDEO Viral
IPL 2023 Mohammed SirajImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 3:28 PM

RCB vs RR IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम मागच्या तीन सीजनप्रमाणे या सीजनमध्येही चांगलं प्रदर्शन करतेय. रविवारी या टीमने आपल्या घरच्या मैदानात राजस्थान रॉयल्स सारख्या मजबूत टीमवर मात केली. या मॅच दरम्यान दरम्यान मोहम्मद सिराजच स्वत:वरील नियंत्रण सुटलं होतं. त्याने आपल्या सहकारी खेळाडूला शिवीगाळ केली. मॅच संपली, टीम जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने कॅमेऱ्यासमोर आपल्या सहकाऱ्याची माफी मागितली.

मोहम्मद सिराजने ज्यूनियर प्लेयर महिपाल लोमरोरची माफी मागितली. 19 व्या ओव्हरमध्ये महिपाल लोमरोरने एक खराब थ्रो केला. त्यावेळी सिराज स्टम्पसला जाऊन धडकला. या प्रसंगानंतर सिराज खूप नाराज दिसला. त्याने महिपालला शिवीगाळ केली. सिराजला नंतर आपली चूक लक्षात आली, त्याने महिपालची माफी मागितली.

महिपाल यावर काय म्हणाला?

महिपाल लोमरोरची दोनवेळा माफी मागितली, असं मोहम्मद सिराजने नंतर आरसीबीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. या प्रकरणात लोमरोरची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. अशा मोठ्या मॅचमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी होत असतात, असं सागून लोमरोरने सिराजला माफ केलं.

सिराज RCB च्या विजयाचा नायक

चालू सीजनमध्ये मोहम्मद सिराज जबरदस्त बॉलिंग करतोय. चिन्नास्वामीच्या पाटा विकेटवर सुद्धा सिराजच्या बॉलिंगची जादू चालली. सिराजने रविवारी राजस्थानचा बेस्ट बॅट्समन जोस बटलरला 0 वर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सिराजने चालू सीजनमध्ये 7 मॅचमध्ये 13 विकेट घेतलेत. सध्या पर्पल कॅप सिराजच्या डोक्यावर आहे. सिराजच्या गोलंदाजीचा इकॉनमी रेट फक्त 7.13 आहे. खरोखर हा कौतुकास्पद रेट आहे. आरसीबीचे 7 मॅचमध्ये 8 पॉइंट झालेत. पॉइंट्स टेबलमध्ये ही टीम 5 व्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना 7 लीग मॅचेसपैकी 4 मॅच जिंकाव्या लागतील. त्यासाठी सिराजने चांगलं प्रदर्शन करणं आवश्यक आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.