पुन्हा एकदा रंगणार भारत इंग्लंड यांच्यात क्रिकेटचा थरार, वन-डेसह टी-20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
भारत आणि इंग्लंड क्रिकेच संघात रंगतदार स्थितीत कसोटी मालिका सुरु आहे. एकीकडे ही मालिका सुरु असताना आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच वेळापत्रकही जाहीर झालं आहे.
लंडन : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून चार सामन्यानंतर भारताने 2-1 ची आघाडी घेतली आहे. अतिशय रगंतदार सुरु असणाऱ्या या मालितेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे आणि टी-20 मालिकेचा थरारही रंगणार आहे. हा थरार पुढील वर्षी जुलैमध्ये रंगणार असून भारत पुन्हा एकदा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) याबद्दलची माहिती बुधवार (8 सप्टेंबर) रोजी दिली. त्यांनी त्यांच्या सर्व आगामी सामन्यांच वेळापत्रक जाहीर केलं यामध्ये भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत इंग्लंडचे सामने असणार आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका ही 1 जुलै ते 6 जुलै या दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. एकदिवसीय सामने हे 9 जुलै 14 जुलै या दरम्यान खेळवले जाणार आहे.
असे असेल भारत विरुद्ध इंग्लंड वेळापत्रक
- पहिला टी-20 सामना 1 जुलै, 2022, मॅचेंस्टर
- दुसरा टी-20 सामना 3 जुलै, 2022, नॉटिंगघम
- तिसरा टी-20 सामना 6 जुलै, 2022, साऊदम्प्टन
- पहिला एकदिवसीय सामना, 9 जुलै, 2022, बर्मिंघम
- दुसरा एकदिवसीय सामना, 12 जुलै, ओव्हल
- तिसरा एकदिवसीय सामना, 14 जुलै, लॉर्ड्स, लंडन
View this post on Instagram
न्यूझीलंड सोबतही इंग्लंड भिडणार
2022 मध्ये इंग्लंड भारताशी भिडण्याआधी न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामने खेळवले जातील. या मालिकेतील पहिली कसोटी लॉर्ड्सच्या मैदानात 2 जून ते 6 जून दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना नॉटिंघममध्ये 10 जून ते 14 जून दरम्यान खेळवण्यात येईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात 23 जून ते 27 जून दरम्यान रंगणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये रंगतदार सामने
भारचत आणि न्यूझीलंड सोबत सामने खेळल्यानंतर इंग्लंड दक्षिण आफ्रिका संघसोबत सर्व प्रकारचे क्रिकेट सामने खेळणार आहे. यामध्ये तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि तीन कसोटी सामन्यांचा समावेश असेल. यावेळी 19 जुलै, 22 जुलै आणि 24 जुलैला अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. त्यानंतर तीन टी-20 सामने 27 जुलै, 28 जुलै आणि 31 जुलै रोजी खेळवण्यात येतील. यानंतर अखेर कसोटी मालिका पार पडणार आहे. यामध्ये 17 ते 21 ऑगस्ट पहिली, 25 ते 29 ऑगस्ट दुसरी आणि 8 ते 12 सप्टेंबर तिसरी कसोटी खेळवली जाणार आहे.