एलिस पेरीकडून ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात कोणालाही न जमलेला पराक्रम, कपिल, इम्रान, बॉथमच्या पंक्तित स्थान

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये (India-W vs Australia-W) डे-नाईट टेस्ट मॅच खेळवली जात आहे.

एलिस पेरीकडून ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात कोणालाही न जमलेला पराक्रम, कपिल, इम्रान, बॉथमच्या पंक्तित स्थान
Ellyse Perry
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 6:24 PM

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये (India-W vs Australia-W) डे-नाईट टेस्ट मॅच खेळवली जात आहे. भारतीय संघाचा हा पहिला डे-नाईट कसोटी सामना आहे, या सामन्यात भारतीय खेळाडू त्यांच्या कामगिरीने छाप पाडण्यात यशस्वी झाले आहेत. भारताच्या पहिल्या डावात स्मृती मांधनाने शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात आठ गडी गमावून 377 धावा करत डाव घोषित केला. भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने मने जिंकली, तर एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने असा विक्रम केला आहे जो त्यांच्या देशातील इतर कोणत्याही खेळाडूने आतापर्यंत केला नाही. एलिस पेरी (Ellyse Perry)असे या खेळाडूचे नाव आहे. पेरीने जो विक्रम केला आहे, तो तिच्या देशातील कोणताही पुरुष किंवा महिला खेळाडू करु शकलेली नाही. (Ellyse Perry Becomes First Woman Cricketer To Achieve 5000 Runs, 300 Wickets In International Cricket)

या सामन्यात पेरीने भारताच्या पूजा वस्त्राकरची विकेट घेताच तिला इतिहासात आपले नाव नोंदवण्यात यश आले. पूजाच्या विकेटसह पेरीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 300 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह, ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट आणि 5000 पेक्षा जास्त धावा करणारी तिच्या देशातील पहिली खेळाडू बनली आहे. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत पुरुष खेळाडू किंवा कोणत्याही महिला खेळाडूने अशी कामगिरी केलेली नाही. तसेच, महिला क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारी पेरी ही पहिली खेळाडू आहे. पेरीने या सामन्यात 27 षटकं गोलंदाजी केली आणि 76 धावा देऊन दोन बळी घेतले. यादरम्यान तिने चार निर्धाव षटकंदेखील टाकली. पूजाला बाद करण्यापूर्वी पेरीने यास्तिका भाटियाला बेथ मुनीकरवी झेलबाद केले होते. पेरीने आतापर्यंत कसोटीत 33 विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये तिने फलंदाजीत आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये 624 धावा केल्या आहेत.

वनडे आणि टी – 20 मध्ये दमदार कामगिरी

दुसरीकडे, जेव्हा टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांचा प्रश्न येतो तेव्हा पेरीने 118 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3135 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि 28 अर्धशतके आहेत. टी – 20 मध्ये तिने 123 सामने खेळले आहेत आणि त्यात 1243 धावा केल्या आहेत. पेरीने या फॉरमॅटमध्ये चार अर्धशतके केली आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर पेरीने एकदिवसीय सामन्यात 152 विकेट्स घेतल्या आहेत. आणि टी -20 मध्ये तिने 115 बळी घेण्यात यश मिळवले आहे.

दिग्गजांच्या यादीत स्थान

पेरीच्या आधी अशी कामगिरी काही पुरुष क्रिकेटपटूंनी केली आहे. तुम्ही ही यादी पाहिली, तर तुम्हाला यात इंग्लंडचा इयान बॉथम, भारताचा कपिल देव, पाकिस्तानचा इम्रान खान, वासीम अक्रम, दक्षिण आफ्रिकेचे जॅक कॅलिस आणि शॉन पोलॉक, श्रीलंकेचे सनथ जयसूर्या आणि चामिंडा वास हे महान खेळाडू दिसतील. आता या क्रिकेटपटूंच्या यादीत एलिस पेरीचे नाव समाविष्ट झाले आहे. पेरीच्या आधी 17 पुरुष खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे.

इतर बातम्या

मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

(Ellyse Perry Becomes First Woman Cricketer To Achieve 5000 Runs, 300 Wickets In International Cricket)

रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य
महापालिका निवडणुका या महिन्यानंतरच, 22 जानेवारीच्या सुनावणीवर भवितव्य.
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?
फडणवीस दिल्लीतून यादी घेऊन आले? नव्या सरकारमध्ये कोण-कोण होणार मंत्री?.