एलिस पेरी विराट कोहलीच्या प्रेमात? विजयानंतर दिली अशी प्रतिक्रिया
विराट कोहली सुरुवातीपासून आरसीबीचा भाग राहिला आहे. विजेतेपद जिंकण्यात आरसीबीच्या संघाला अजून यश आलेले नसले तर तीन वेळा ते फायनलमध्ये पोहोचले आहे. आरसीबीच्या महिला संघाने मात्र विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर त्यांना विराटसोबत सेलिब्रेशन देखील केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
RCB Win : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पहिले जेतेपद पटकावल्याने विराट कोहलीने देखील तो विजय साजरा केला. महिला संघाने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विराट सोबत सेलिब्रेशन केले. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो 2008 पासून आरसीबीसाठी खेळतो आहे.
RCB च्या पुरुष संघासोबत, विराट कोहली तीन आयपीएल फायनलमध्ये खेळला पण त्याला विजय मिळवता आला नाही. त्यानंतर त्याने कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. संघाला विजेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर रविवारी (17 मार्च) संपली जेव्हा WPL 2024 च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आरसीबी महिला संघाने आठ गडी राखून पराभव केला.
दिल्ली कॅपिटल्सचा पराभव
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 19 ओव्हरमध्ये सर्वबाद 113 धावा केल्या. बिनबाद 64 वर ते खेळत होते. पण नंतर पटापट विकेट गेल्याने त्यांना मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. सोफी मोलिनक्सने एका ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत डीसीची 3 बाद 64 अशी अवस्था करून खेळाचा कल पूर्णपणे बदलून टाकला. त्यानंतर श्रेयंका पाटीलने चार विकेट घेत आरसीबीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
113 धावांचा पाठलाग करताना आरसीबीने तीन बॉल शिल्लक ठेवून विजय मिळवला. सलामीवीर स्मृती मानधनाने ३१ आणि सोफी डिव्हाईन ३२ रन केले. एलिस पेरीने नाबाद ३५ रन तर रिचा घोषने नाबाद १७ रन केले. रिचाने शेवटच्या षटकात विजयी चौकार मारत विजय मिळवला. त्यानंतर विराट कोहली एका व्हिडिओ कॉलद्वारे सेलिब्रेशनमध्ये सामील झाला.
विराटसोबत सेलिब्रेशन
या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाला आहे आणि अनेकांनी त्याच्या हृदयस्पर्शी हावभावाबद्दल भारताच्या सुपरस्टारचे कौतुक केले आहे. व्हिडिओ कॉलमधील आणखी एक खास क्षण आता समोर आला आहे ज्यामध्ये विराट कोहली आणि पेरी यांचा समावेश आहे. व्हिडिओ कॉल दरम्यान, पेरीने एक प्रतिक्रिया दिली ती म्हणजे “V फॉर विराट!”
The way Perry said, “V for Virat” has my heart! 💕 pic.twitter.com/g9Vgg4w77O
— Shivani❤️ (@shivi1251) March 18, 2024
पेरीबद्दल सांगायचे तर, तिने WPL 2024 मध्ये RCB साठी बॅटींग आणि बॉलिंग दोन्ही भूमिकेत चांगली कामगिरी केली. लीग गेममध्ये तिने 15 धावांत 6 बळी घेतले आणि नाबाद 40 धावा करून RCBला गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करण्यात आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यास मदत केली. प्लेऑफमध्ये, तिने 66 धावा केल्या आणि अंतिम सामन्यात आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करण्यापूर्वी एक विकेट देखील घेतली.